नंदुरबार l प्रतिनिधी
पुंडलिक वरदे हरी विठ्ठल,श्नी ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जयघोषात आराध्य दैवत भगवान विठ्ठलाचा १२ फूट मूर्तीचे लोकार्पण आषाढी एकादशीचा मुहूर्तावर रविवारी शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी,माजी नगराध्यक्ष सौ.रत्ना रघुवंशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परिसरात करण्यात आलेल्या विद्युत आकर्षक रोषणाईने संपूर्ण परिसर झगमगून गेला होता.
शिवसेना संपर्कप्रमुख आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या संकल्पनेतून नगरपरिषदेचा माध्यमातून शहरातील लोकनेते स्व.बटेसिंग भैया रघुवंशी उद्यानाचा दर्शनी भागाचा ठिकाणी उंचावर १२ फुटाची मूर्ती स्थानापन्न करण्यात आली.तत्पूर्वी महापूजा करण्यात येऊन आरती झाली. लोकार्पण सोहळ्याप्रसंगी विठ्ठल भक्तांच्या आनंद गगनाला भिडलेला होता. विठ्ठल विठ्ठल.. विठ्ठला… हरी ओम विठ्ठलाचा जय जयघोष आणि भाविकांच्या निस्सिम भक्तीने परिसर दुमदुमून गेला होता.यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लोकार्पण सोहळ्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात आषाढीनिमित्त भाविकांच्या उपवास असल्याने फराळाचे वाटप शिवसेना जिल्हा प्रमुख ॲड. राम रघुवंशी यांनी केले.
विठ्ठलाची मूर्ती गरीब,श्रीमंत,शेतकरी,कष्टकरी आणि सर्व भक्तांना भक्ती, प्रेम आणि समता यांसारख्या मूल्यांची प्रेरणा देईल.प्रेम, दया आणि सहानुभूती यांसारख्या गुणांची शिकवण आपल्याला वारकरी संप्रदायातून मिळत असते त्याचेच प्रतीक बा विठ्ठल आहेत.
आ.चंद्रकांत रघुवंशी