नंदुरबार | प्रतिनिधी
नंदुरबार येथील संत सावता महाराज मंदिरात दिनांक २५ जून २०२५ रोजी नवनिर्वाचित नंदुरबार माळी पंच मंडळाची बैठक साजरी झाली. या बैठकीत नूतन कार्यकारिणीची एकमताने निवड करण्यात आली.
या वेळी अध्यक्षपदी निलेश श्रीराम माळी यांची, तर उपाध्यक्षपदी धर्मेंद्र पांडुरंग पाटील यांची सर्वानुमते निवड झाली. सचिव म्हणून निंबा मोहन माळी, सहसचिव म्हणून मनोज मोहन गायकवाड, कोषाध्यक्षपदी विजय यादव माळी, कार्याध्यक्षपदी पंडीत कौतिक माळी यांची निवड करण्यात आली.
तसेच सहकार्याध्यक्षपदी जगन्नाथ लोटन माळी, सहकोषाध्यक्ष देवाजी फुला माळी, प्रसिद्धी प्रमुख म्हणून कैलास सुखदेव माळी, जगन्नाथ श्रावण माळी आणि रमेश पांडुरंग माळी यांची निवड झाली आहे.
बैठकीत समाजहितासाठी विविध उपक्रम, नियोजन व आगामी काळात राबवायच्या कार्यक्रमांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. उपस्थित सर्वांनी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे हार्दिक अभिनंदन केले.
या प्रसंगी पंच मंडळ सदस्य म्हणून रामभाऊ वेडू माळी, बापू पांडुरंग माळी, प्रकाश अवचित पाटील, हरीश हसरत माळी, नाना हिरालाल माळी, बन्सीलाल नारायण माळी, राजधार गुलाब माळी, योगेश बन्सीलाल माळी, राजेंद्र खंडू माळी, मनोज भिमराव माळी, अर्जुन तुमडू माळी, आकाश उत्तम झाल्टे, किसन गोविंदा माळी, पांडुरंग दौलत माळी, आप्पा गोरख माळी, खंडू भाईदास माळी, वसन वामन माळी, विजय उखा माळी, युवराज बापूजी माळी आणि ज्ञानेश्वर माळी महाराज यांची निवड झाली.
संपूर्ण बैठकीचे संचालन सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडले असून समाजहिताच्या दृष्टीने ही नवीन कार्यकारिणी प्रेरणादायक कामगिरी करेल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.