नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे हे येत्या 4 जुलै 2025 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असून त्यांच्या उपस्थितीत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिरात सकाळी दहा वाजता पक्षाचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे. या मेळाव्यात राष्ट्रवादी पक्षाचा जिल्हा आढावा घेण्यात येणार असून स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक संदर्भात मार्गदर्शन करण्यात येणार आहे आहे. अशी माहिती अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यानी पत्रपरीषदेत दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहादा शहराध्यक्ष सुरेंद्र कुंवर उपस्थित होते.
मदर टेरेसा हायस्कुल च्या सभागृहात आयोजित पत्रकार परीषदेत ते बोलत होते. डॉ मोरे म्हणाले,राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, माजी मंत्री आनंद परांजपे, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष इद्रीस नायकवाडी, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, ओबीसी सेलचे अध्यक्ष कल्याण आखाडे,सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष सुनिल मगरे, विद्यार्थी सेलचे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, युवती प्रदेशाध्यक्ष संध्या सोणवणे, वाहतुक सेलचे अध्यक्ष सचिन जाधव, माजी पालकमंत्री तथा पक्षाचे उमविचे प्रभारी अनिल पाटील आदी राज्य प्रमुख मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी या मेळाव्याला मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही डॉ मोरे यांनी केले. मेळाव्यात राज्यातील प्रमुख पदाधिका-यांचे जल्लोषात स्वागत करण्यात येणार आहे.. प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये अनेक आजी, माजी सरपंच, नगरसेवक, स्थानिक स्वराज्य संस्थेचे सदस्य पक्षात प्रवेश करणार आहेत, अशीही माहिती त्यांनी दिली.
आढावा बैठकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्यावतीने नियोजन करण्यात आले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा मेळावा अतिशय महत्वाचा आहे. हा जिल्हा दौरा कार्यकर्त्यांना प्रेरणा देणारा व उत्साह वाढवणारा असणार आहे. त्यांचे विचार ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक आहेत. कार्यकर्त्यांना न्याय देण्यासाठी प्रसंगी स्वबळावर निवडणूका लढवल्या जावू शकतात. मात्र महायुतीच्या मित्र पक्षांनी एक हात पुढे केला व जागा वाटपासंदर्भात एकमत झाले तर उत्तम असेल.
इतर पक्ष देखील आमच्या सोबत येण्याची शक्यता आहे. नदुरबार जिल्हयात अनेक पक्षांमध्ये दुफळी निर्माण झालेली आहे. या सगळ्या गोष्टींचा उहापोह केला असता एक वेगळे समिकरण या निवडणुकांमध्ये दिसेल, असे मला वाटते. जि प.प. स मध्ये पुरेसे संख्या बळ असेल तर सत्ता स्थापन करु किंवा आमच्या पाठबळावर कुणीही सत्तेत येवू शकते. यासाठी वरीष्ठाशी चर्चा केली जाईल. मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर पक्षात चैतन्याचे वातावरण, आहे, असे डॉ मोरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.