Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

team by team
June 30, 2025
in राजकीय
0
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित जम्बो कला-क्रीडा स्पर्धा ठरल्या प्रेरणादायी

नंदुरबार l प्रतिनिधी-

संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त डॉ.हिनाताईंच्या चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी आयोजित केलेल्या जम्बो स्वरूपातील विविध कला आणि क्रीडा स्पर्धांमधील 70 विजेत्यांना पारितोषिक वितरणाचा दिमाखदार व शानदार असा भव्य रंगारंग सोहळा बाबा रिसॉर्ट सभागृहात अत्यंत जल्लोषात पार पडला.

या रंगारंग सोहळ्याला गीत संगीताच्या साथ सोबतीने खरा साज चढवला. डॉक्टर हिना गावित यांच्यावर सातत्याने चालू असलेला शुभेच्छांचा वर्षाव, गटागटाने केक घेऊन येणाऱ्यांची रेलचेल, स्पर्धेमध्ये पहिला, दुसरा व तिसरा क्रमांक पटकावलेल्या कलाकारांनी सादर केलेले दिलखेच नृत्य, त्याला उपस्थितांकडून शिट्या-टाळ्यांच्या वर्षावात मिळणारी दाद हे या सोहळ्याचे मोठे निराळे वैशिष्ट्य ठरले.

बुद्धिबळ स्पर्धेत विविध गटातील 30, मॅरेथॉन स्पर्धेत विविध गटातील 12, फुटबॉल स्पर्धेतील 6, नृत्य स्पर्धेतील 6, रांगोळी स्पर्धेतील 6, ग्रँड मेकअप स्पर्धेतील 10 अशा एकूण 70 पारितोषिकांचे वितरण महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते करण्यात आले. सर्व स्पर्धां मधील सहभागी विद्यार्थी विद्यार्थिनी तरुण तरुणी तसेच त्यांचे प्रशिक्षक आणि पालक यांच्याप्रमाणेच कला क्रीडा शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर तसेच नंदुरबार जिल्ह्याच्या विविध भागातील जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सरपंच उपसरपंच तसेच विविध पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 27 जून आणि 28 जून 2025 रोजी पार पडलेल्या या सहा प्रकारच्या स्पर्धांमधील वेगवेगळ्या गटाच्या विजेत्यांसाठी सुमारे 70 रोख बक्षीस आणि पारितोषिके ठेवण्यात आली होती. ट्राॅफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम असे स्वरूप होते.

 

कौशल्याचे व क्षमतांचे विशेष कौतुक : डॉ. विजयकुमार गावित

महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आणि संसद रत्न माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी केलेल्या भाषणातून सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करीत सर्वांच्या कला कौशल्याचे व क्षमतांचे विशेष कौतुक केले तसेच भाषणात पुढे सांगितले की, प्रत्येक गावाचा आणि वंचित घटकांचा विकास व्हावा हे उद्दिष्ट समोर ठेवून आजपर्यंत विविध योजनांचा विक्रमी लाभ जनतेला सरकारच्या माध्यमातून आम्ही मिळवून देऊ शकलो. परंतु त्याच बरोबर नंदुरबार शहरातील आणि जिल्ह्यातील कला क्रीडा संस्कृती व शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा भरीव योगदान देण्याचा आम्ही सातत्याने प्रयत्न करीत आलो आहोत. त्याचे प्रयत्न अधिक व्यापक करण्याचा मानस आहे आणि जिल्ह्यातील कला क्रीडा संस्कृती व शैक्षणिक प्रगतीसाठी सुद्धा बांधिल आहोत. चाहत्यांनी व कार्यकर्त्यांनी केलेल्या आयोजनातून नंदुरबार जिल्ह्यात प्रथमच वाढदिवसानिमित्त इतक्या मोठ्या स्वरूपातील स्पर्धा पार पडल्या. म्हणून आयोजकांचे देखील भाषणातून त्यांनी जाहीर कौतुक केले.

 

विद्यार्थ्यांच्या बौद्धिक निपुणतेचा अभिमान : डॉ. हिना गावित
21 मीटर धावण्याच्या मॅरेथॉन स्पर्धेत लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनी किती उत्स्फूर्त सहभाग घेतला, बुद्धिबळ स्पर्धेत अवघ्या इयत्ता दुसरीतील विद्यार्थ्याने आणि अन्य मुलांनी खरोखरचे बौद्धिक बळ कसे दाखवले, रांगोळी स्पर्धेत ऑपरेशन सिंदूर सारख्या राष्ट्रीय विषयांचे चित्रण कसे वैचारिक ऊंची दर्शवणारे ठरले, तरुण-तरुणींचे नृत्य प्रकार किती ऊर्जादायक होते; याचा डॉक्टर हिना गावित यांनी आपल्या भाषणातून विशेष उल्लेख केला आणि आपल्या जिल्ह्यातही बौद्धिक निपुणता असल्याबद्दल अभिमान व्यक्त केला.

 

या स्पर्धांमुळे युवक युवती तसेच विद्यार्थ्यांमध्ये मोठे उत्साहाचे वातावरण दिसून आले. यामुळे आम्हाला नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली अशा प्रतिक्रिया उपस्थित स्पर्धक व त्यांचे पालक यांच्यातून व्यक्त करण्यात आली. भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष जे एन पाटील यांनी संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या मान्यवरांनी संपूर्ण सोहळ्याचे आयोजन व व्यवस्थापन केले.

बातमी शेअर करा
Previous Post

शेतकऱ्यांसाठी सौर पंप अर्ज करण्यापासून ते लाभ मिळवण्यापर्यंतची संपूर्ण माहिती जाणून घ्या

Next Post

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

Next Post
नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

नंदुरबारात विठू माऊलीची भव्य १२ फुटांचा मूर्तीचे आषाढी एकादशीला लोकार्पण,5 जुलैला टाळ मृदुंगाच्या गजरात सवाद्य मिरवणूक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add