Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन, सहभागी होण्याचे विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे आवाहन

team by team
June 24, 2025
in राजकीय
0
डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन, सहभागी होण्याचे विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीचे आवाहन

नंदुरबार l प्रतिनिधी

नंदुरबार येथील विजय गौरव क्रीडा महोत्सव समितीच्या वतीने नंदुरबार लोकसभा मतदार संघाच्या माजी खा.डॉ.हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त दि.२७ व २८ जून रोजी सलग दोन दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्यांना पारितोषिके देण्यात येणार असून या स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजन समितीने केले आहे.

 

नंदुरबार येथे आ.डॉ.विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानी पत्रकारपरिषद घेण्यात आली. याप्रसंगी भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील यांनी माजी खा.डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्या वाढदिवसानिमित्त २७ व २८ जूनला विविध स्पर्धा व कार्यक्रमांची माहिती दिली.

 

नंदुरबार येथे दि. २७ व २८ जून २०२५ असे दोन दिवस विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक कार्यक्रमांचे माजी खा. डॉ. हिना गावित यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन केले आहे.

 

 

दि.२८ जून रोजी सकाळी ७ वाजता मॅरेथॉन स्पर्धांना आ.डॉ. विजयकुमार गावित यांच्या निवासस्थानापासून सुरुवात होईल. ही मॅरेथॉन चार गटात होणार असून इयत्ता ८ वी ते १० वी मुले पाच किमीचा पहिला गट, इ.८ वी ते १० वी मुली पाच किमीचा दुसरा गट व सिनीयर गट पुरुष २१ किमीचा तिसरा आणि सिनीयर गट महिला १० किमीचा चौथा गट असेल. मॅरेथान स्पर्धेसाठी प्रा. डॉ. ईश्वर धामणे व प्रा. निकुंभ यांच्या संपर्क साधावा. तसेच दि. २७ व २८ जून रोजी सकाळी ७ वाजता नंदुरबार शहरातील एस.ए. मिशन हायस्कूलमध्ये फुटबॉल स्पर्धा होणार आहे.

 

 

 

ही फुटबॉलची स्पर्धा अंडर १४ (मुले फक्त) व अंडर १९ (मुले फक्त) अशी असून अमोल डलगे, डॉ. हिवाळे यांच्याशी स्पर्धेसाठी संपर्क साधावा. दि.२८ जून रोजी सकाळी नऊ वाजता नंदुरबार पंचायत समितीच्या स्व. हेमलताबाई सभागृहात बुध्दीबळ स्पर्धा होणार आहे. मुले/मुली (अंडर ११), मुले/मुली (अंडर १५), महिला/पुरुष खुला गट व मुले/मुली (अंडर ७) या गटानुसार बुध्दीबळ स्पर्धा होणार असून शोभराज खोंडे यांच्याशी संपर्क साधावा. दि. २७ जून रोजी सकाळी १० वाजता नंदुरबार येथे बाबा रिसॉर्टमध्ये ग्रँड मेकअप कॉम्पीटीशन ही स्पर्धा केवळ महिलांसाठी असून वेस्टर्न व ट्रॅडिशनल अशी असेल. या ग्रँड मेकअप स्पर्धेकरीता नेहा पारेख व मितेश भावसार यांच्याशी संपर्क करावा.

 

 

 

दि.२८ जून रोजी सकाळी ८ वाजता गिरीविहार वाडीत रांगोळी स्पर्धा ही मुले/मुली (अंडर १९), मुले / मुली (सिनीयर गट) अशी असणार आहे. स्पर्धेसाठी संपर्क डी.यु. पाटील. दिक्षीत यांच्याशी साधावा. दि. २७ जून रोजी सकाळी १० वाजता बाबा रिसार्ट येथे नृत्य स्पर्धेचे आयोजन केले आहे. या सांस्कृतिकमध्ये सोलो व ग्रुप डान्स असणार आहेत. या स्पर्धेकरीता क्रीष्णा बोरसे यांच्याशी संपर्क करावा. या सर्व स्पर्धांसाठी नाव नोंदणी दि. २६ जून रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात येईल. स्पर्धांमधील विजेत्या स्पर्धकांना दि. २८ जून रोजी सायंकाळी पाच वाजता नंदुरबार येथे बाबा रिसॉर्टमध्ये पारितोषिक वितरण करण्यात येणार आहे.

 

 

 

तसेच सर्व आयोजित स्पर्धांचे उद्घाटन व पारितोषिक वितरण आ.डॉ. विजयकुमार गावित, माजी खा. डॉ. हिना गावित, माजी जि.प.अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या विविध स्पर्धांमध्ये खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन विजय गौरव क्रीडा महोत्सव समिती नंदुरबार यांच्या वतीने करण्यात आले आहे. यावेळी भाजपा नंदुरबार तालुकाध्यक्ष दिपक पाटील, मुन्ना पाटील, ईश्वर धामणे, सागर तांबोळी, श्याम मराठे, आनंद माळी, लक्ष्मण माळी, संतोष वसईकर, महेंद्र पाटील आदी उपस्थित होते.

बातमी शेअर करा
Previous Post

घरकुल आढावा बैठकीत तक्रारींच्या पाऊस,योजनेसाठी पैशांची मागणी; आमदारांनी दिले कारवाईचे निर्देश

Next Post

आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

Next Post
आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

आणीबाणीत कारावास झालेल्या बंदिवानांचा जिल्हा प्रशासनाकडून गौरव

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील विद्यालयाचा दहावीचा निकाल ८६.२७ टक्के

May 9, 2026
श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

श्री.छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक विद्यालयाची शंभर टक्के निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

नांदरखे आश्रम शाळेच्या विद्यार्थ्यांचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश

May 9, 2026
के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम,  शाळेचा १०० टक्के निकाल

के.डी. गावित सैनिकी विद्यालयाच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम, शाळेचा १०० टक्के निकाल

May 9, 2026
एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

एस.ए. मिशन हायस्कूलचा दहावीला ९८.७९ टक्के निकाल

May 9, 2026
दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

दोन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय रद्द करा ; डॉ.हिना गावित यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदन

May 9, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add