नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार येथील अहिंसा इंटरनॅशनल स्कूल इ. नववीचा विद्यार्थी श्रेयस राजु मार्तंड याने बँकॉक, थायलंड येथे पार पडलेली सातवी आंतरराष्ट्रीय रोलर रिले स्कॅटिंग स्पर्धा २०२५ मध्ये 16 वर्ष वयोगटातील स्पर्धेत एक सुवर्ण व एक रौप्य पदक प्राप्त करून नंदुरबार जिल्हाचे आंतर राष्ट्रीय स्तरावर नाव लौकिक केले.
श्रेयस मार्तंड याला छत्रपती संभाजी नगर येथील भिकन अंबे, आंतरराष्ट्रीय कोच व नंदुरबार येथील छत्रपती क्लब चे नंदु पाटील, राष्ट्रीय कोच यांचे मार्गदर्शन लाभले.श्रेयस हा सार्वजनिक बांधकाम विभाग, नंदुरबार येधील शाखा अभियंता आर. टी. मार्तंड यांचा मुलगा आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता इंजि. अनिल पवार व कार्यकारी अभियंता इंजि.अंकुश पालवे, कार्यकारी अभियंता, उपअभियंता इंजि. गणपत गावित यांनी श्रेयस याने मिळवलेल्या यशा बद्दल व भावी वाटचालीसाठी त्यास शुभेच्छा दिल्या.