भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात योगदिन साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी
नं. ता. वि. स. संचलित शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर ता.नंदुरबार येथे “आंतरराष्ट्रीय योग दिन” उत्साहात साजरा करण्यात आला.
शाळेतील इ. पाचवी ते १२ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे योगसने व प्राणायाम केले. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारीऱ्यांनी देखील योगासने व प्राणायाम केली .योग शिक्षक एन.जी.पाटील यांनी योग व प्राणायाम प्रकारांचे प्रात्यक्षिक करून दाखविले.
प्राचार्य आर.एच. बागुल यांनी योग दिनाचे महत्त्व सांगत योग मानसाला निरोगी व सकारात्मक राहण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खूपच उपयुक्त आहे.योग दिनाचा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.