भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालयात आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात साजरा
नंदुरबार l प्रतिनिधी
का. वि. प्र. संस्था भालेर संचलित श्रीमती क. पू. पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय तसेच दि फ्युचर स्टेप इंग्लिश मिडियम स्कूल येथे आंतरराष्ट्रीय योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नंदुरबार जि. प.च्या अध्यक्षा सुप्रिया गावित, भाजपा तालुकाध्यक्ष दीपक पाटील ,जे. एन. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील , भालेरच्या सरपंच सौ. के. सी. पाटील , सचिव भिका पाटील, माजी पर्यवेक्षक पी.पी.बागुल, अभिमान पाटील, बी. के. पाटील, ग्राम विस्तार अधिकारी एस. पी. पाटील, फकीरा पाटील, मुख्याध्यापक एस. जी. सैंदाणे सह मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष सुप्रिया गावित यांनी विद्यार्थ्यांना योगाचे मार्गदर्शन तसेच योगाचे फायदे याबाबत आपल्या मनोगतातून मार्गदर्शन केले, क्रीडा शिक्षक एस. एस. पाटील व सौ एस. पी. पाटील यांनी विद्यार्थ्यांना विविध योगासने यांची माहिती व प्रत्यक्ष कृती करून दाखवली तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्हि. व्हि. इसी यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व पर्यवेक्षक प्राध्यापक प्राध्यापिका शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी परिश्रम घेतले.