नंदुरबार l प्रतिनिधी-
उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथे विश्व कल्याणासाठी व देश रक्षणासाठी शहीद जवानांना साठी येथील अन्नपूर्णा भवानी माता नीलकंठेश्वर ट्रस्ट देव उमर्दे खुर्द ता. नंदुरबार येथे ब्रह्मलीन श्री श्री १००८ महंत जोगेश्वराजी यांच्या आशीर्वादाने व श्री. शंभू पंच अग्नि आखाड्याचे राष्ट्रीय महामंत्री महंत श्री गुरु सोमेश्वरानंद जी यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती यागास यज्ञात आहुती देऊन सांगता झाली.
श्री. महंत सोमेश्वरानंदजी यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी शिष्य व ग्रामस्थांकडून सुंदर कांडाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विशाल भंडाराचे आयोजन करण्यात आले होते भंडाराचा व दर्शनाचा लाभ परिसरातील नंदुरबार, उमर्दे खुर्द, अक्राळे येथील भाविकांनी यावेळी म्हणून सोमेश्वरानंदजी व भक्त गण यांनी शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. तीन दिवशी शिवशक्ती याग यज्ञाचे यज्ञाचार्य म्हणून दिनेश मुळे यांनी काम पाहिले.श्री अन्नपूर्णा भवानी माता नीलकंठेश्वर ट्रस्ट व ग्रामस्था तर्फे भंडाऱ्याचे आयोजन करण्यात आले होते.