Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

team by team
June 10, 2025
in राजकीय
0
संकल्प ते सिध्दी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कार्य घरा-घरापर्यंत पोहवचा: भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी 

नंदुरबार l प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला तीस मे रोजी अकरा वर्ष पुर्ण झाली असून ‘संकल्प ते सिध्दी’ या माध्यमातून मोदी सरकारचा गेल्या अकरा वर्षातील यशस्वी प्रवास नंदुरबार जिल्हयातील कानाकोप-यात पोहचावा, या दृष्टीने भाजपाच्यावतीने २५ जून पर्यंत विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत., अशी माहिती भाजपाचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी शहरातील कन्यादान मंगल कायार्याल येथे भाजपा नंदुरबार जिल्हा आयोजित संकल्प ते सिद्धी कार्यशाळेत दिली.

या बैठकीस जिल्हाध्यक्ष निलेश माळी, प्रा.पंकज पाठक, बळीराम पाडवी, सदानंद रघुवंशी, श्महेंद्र पाटील, संदीप अग्रवाल, डॉ.सपना अग्रवाल, श्रीमती.शानूताई वळवी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी विजय चौधरी म्हणाले, देशात नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर या अकरा वर्षात देश झपाटयाने बदलला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी जी यांच्या अकरा वर्षाच्या कार्यकाळात भारताचे ऐतिहासिक प्रगती झाली. सार्वजनिक लाभाच्या योजना व वैयक्तिक लाभाच्या योजना घराघरापर्यंत पोहोचल्या, भारत आर्थिक दृष्ट्या बाराव्या स्थानावरून चौथ्या स्थानावर आला, देशभरात जवळपास 22 कोटी नागरिक दारिद्र्य रेषेच्या बाहेर निघाले, देशात सिंचन, आरोग्य, रस्ते, उद्योग व्यवसाय सगळ्या क्षेत्रात कमालीची प्रगती होत आहे, भारत आर्थिक महासत्ता होत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जगाने मान्य केले आहे, अकरा वर्षात जे मोदीजींनी करून दाखवले ते काँग्रेस पक्षाला साठ वर्षात देखील करता आले नाही हा एक इतिहास आहे, सबका साथ – सबका विश्वास – सबका प्रयास या त्रीसूत्रीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदीनी देशात चौफेर विकास केला, भारताकडे पाण्याच्या जगाच्या दृष्टिकोन बदलला. मोदीची अकरा वर्षातील विकासात्मक कार्य जनतेपर्यंत विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून पोहोचवा असे आवाहन भाजपा प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांनी केले.

कार्यशाळेत दिलेली संपुर्ण माहिती जिल्हयाभरात चौक सभा घेवून देण्यात येणार आहे. तसेच शासकीय योजनांची माहिती शिबीराच्या माध्यमातून दिली जाणार आहे. लहान मोठे व्हीडीओच्या माध्यमातून चित्रात्मक ग्राफीक्सच्या स्पर्धा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकीर्दीतच्या कामगिरीची प्रदर्शनी आदी कार्यक्रम राबविण्यात येणार आहेत. यासाठी कार्यशाळाही घेण्यात आली आहे. 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार आहे. यात भाजपाच्या कार्यकर्ते शतप्रतिशत सहभागी होणार आहेत. तत्पूर्वी पंधरा ते वीस जून पर्यंत योग प्रशिक्षण वर्ग घेण्यात येणार आहेत. यासाठी खासगी संस्थांची मदत देखील घेतली जाणार आहे. तसेच 25 जून रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी लावलेली आणीबाणी, या कार्यकाळात काँग्रेसने केलेल्या अत्याचाराची, लोकशाहीची केलेली हत्या म्हणून हा दिवस काळा दिवस म्हणून पाळण्यात येणार आहे, अशी माहिती विजय चौधरी यांनी दिली. एकंदरित विविध व्यावसायिकांचे संमेलन, विकसित भारत संकल्प सभा, चौक सभा, डिजिटल प्रतियोगिता, प्रदर्शनी, मिडीया पॅनेल चर्चा, साहित्य आदी कार्यक्रमांची रुपरेषा आखण्यात आली आहे, भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी संकल्प ते सिध्दी हा कार्यक्रम मोठया उत्साहात राबवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

पद्य आणि घोषणांचा गजरात श्री शिवछत्रपती पालखी शोभायात्रा 

Next Post

शिवशक्ती याग यज्ञाची सांगता, शक्तीच्या उपासनेने कोरोनासह इतरही रोगमुक्त होणार-श्री. महंत सोमेश्वरानंदजी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add