नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्ह्याचे लाडके नेते तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावाला भेट देऊन जनसंवाद करीत समस्या जाणून घेणे पुन्हा सुरू केले आहे. परिणामी ग्रामस्थांच्या अडचणी दूर होत असून गावसमस्या देखील मार्गी लागायला सुरुवात झाली आहे.
डॉक्टर विजयकुमार गावित यांच्या गाव भेटीच्या या उपक्रमामुळे लोकांमधून ‘नेता असावा तर असा..’ अशा प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. नेता लोकांमध्येच शोभून दिसतो; हे आपल्या जिल्ह्याचे लाडके नेते तथा महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी पुन्हा दाखवून दिले. प्रत्येक गावाला भेट देत समस्या जाणून घेणे त्यांनी सुरू केले आहे त्या अंतर्गतच शहादा तालुक्यातील शहादा तालुक्यातील सावळदा, बह्याने, बुपकरी आदी गावांमध्ये जनसंवाद करीत डॉक्टर विजयकुमार गावित यांनी ग्रामस्थांचे म्हणणे सविस्तर ऐकून घेत समस्या जाणून घेतल्या. रस्ते, गटारी, वीज, पाणी, शेतीपंप यासह सर्व कामांना गती देणार असून येत्या पाच वर्षात गाव समस्या मुक्त झालेले दिसेल; अशी ग्वाही महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे लाडके नेते आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी दिली.
प्रत्येक गावात उपस्थित ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत म्हणणे मांडले. दिनांक 3 जून 2025 रोजी बुपकरी गावात ग्रामस्थांच्या समस्या त्यांनी जाणून घेतल्या आणि ते मार्गी लावण्यासाठी काय करणार याची माहिती दिली. ग्रामस्थांनी त्यावर मनापासून समाधान व्यक्त केले. जिल्हा परिषदेच्या माजी सभापती हेमलता शितोळे शहादा पंचायत समिती सभापती सिताराम ठाकरे शहादा भाजपा तालुकाध्यक्ष विजय पाटील भाजपा माजी तालुकाध्यक्ष विजय पाटील भाजपा ज्येष्ठ कार्यकर्ते सुनील पाटील बुपकरी माजी सरपंच नवनीत पवार माजी सरपंच कृष्णा ठाकरे विलास पाटील रामचंद्र पाटील नारायण पाटील धनराज पाटील ईश्वर पाटील यांच्यासह गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.