नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हाभरात पोलिसांनी राबविलेल्या अभियानात ८८ गुरे जप्त केली. नंदुरबार, नवापूर व शहादा येथे ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी नऊ संशयितांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नंदुरबार शहर पोलिस ठाण्याचे हद्दीत पोलिस निरीक्षक अमितकुमार मनेळ व पथकाने संशयित शेख यासीन अरमान कुरेशी (रा. बिस्मिल्ला चौक, नंदुरबार), फिरोज खान जहीर खान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार), आसिफ मरजान कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार), कुरेशी जाविद नवाब (रा. अलिसाब मोहल्ला, नंदुरबार), जफ्फर ऊर्फ शंभू आमन कुरेशी (रा. बिस्मिल्ला चौक, नंदुरबार) व आजीम शेख शहाबुद्दीन कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) व जब्बार सत्तार कुरेशी (रा. कुरेशी मोहल्ला, नंदुरबार) यांच्या ताब्यातून एकूण १३ गुरांची सुटका करीत ताब्यात घेतले.
तर नवापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत व पथकाने एजाज अब्दुलगणी शेख (रा. राजीवनगर, नवापूर) याच्या ताब्यातून एकूण ५७ गुरांची सुटका करीत जप्त केले. शहादा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पोलिस निरीक्षक नीलेश देसले व पथकाने इरफान मुक्तार खान (रा. अमन कॉलनी, मलोनी, ता. शहादा) नंदुरबार याच्या ताब्यातून एकूण १८ गुरांची सुटका केली आहे.
एकूण ७ लाख ६ हजार ३०० रुपये किमतीची एकूण ८८ गुरे निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत मिळून आली. ही कारवाई नवापूर, शहादा व शहर पोलिसांकडून करण्यात आली.