शहादा l प्रतिनिधी
दलित वस्तीकरिता शासनाकडून आमदारांसाठी पन्नास लाख मिळणा-या निधी मधून 25 लाख इतकी रक्कम मी या पंचशील परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी देत आहे .या निधीमुळे उर्वरित रस्ता पूर्ण करता येईल, शहाद्याच्या सर्वांगिंन विकासा साठी विशेष लक्ष असुन , हद्दी बाहेरील वसाहतीत रस्ते, गटारींसह मूलभूत सुविधा येत्या ६ महिन्यात उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन आमदार राजेश पाडवी यांनी पंचशील परिसर शहादा येथे दहा लाखाच्या काँक्रिटीकरण रस्त्याचेभुमिपुजन प्रंंसगी दिले .
यावेळी आमदार राजेश पाडवी पुढे म्हणाले की , शहादा शहर हद्दवाढीचा प्रस्ताव प्रलंबित आहे. सदर हद्द वाढीसाठी आमचे कसून प्रयत्न सुरू आहेत. हद्दवाढ झाल्यानंतर ज्या हद्दीबाहेरील वसाहती आहेत त्यांचे प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी आपला सातत्याने प्रयत्न राहील, तसेच याकामी 50 कोटी रुपये मंजूर करून आणू व सहा महिन्यात शहरातल्या या हद्दीबाहेरील वस्तीचा विकास करू .तसेच दलित वस्तीतून आमदारांसाठी मिळणाऱ्या पन्नास लाख निधी मधून 25 लाख इतकी रक्कम मी या पंचशील परिसरातील रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी देत आहे .असेही यावेळी आमदार राजेश पाडवी यांनी स्पष्ट केले , आमदार यांच्या निधीतून पंचशील काॅलणीसा साठी दोन हायमस्ट लॅम्प उपलब्ध करुन दिल्याचे जितेंद्रे जमदाडे यांनी यावेळी बोलतांना स्पष्ट केले
प्रास्तविक करतांना केंद्रप्रमुख नरेंद्र महिरे म्हणाले की, पंचशील नगर व परिसरात अनेक वसाहती असून गेल्या तीस वर्षांपासून या वसाहती अनेक समस्यांनी ग्रस्त आहेत .जितेंद्र जमदाडे जिल्हा सरचिटणीस भाजपा यांच्या सहकार्यातून सदर रस्ता काँक्रिटीकरणातून तयार होत आहे. या परिसरासाठी जितेंद्र जमदाडे यांच्या माध्यमातून यापूर्वीदेखील दोन हायस्ट लॅम्प, विद्युत खांबे व पथदिवे बसविण्यात आले असून दर वर्षी या रस्त्यावर खडीकरणाचे काम जितेंद्र जमदाडे यांच्या माध्यमातून होत आहे. परिसरातील नागरिकांनी याबद्दल समाधान व्यक्त केलं आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोहिदे त.श.ग्रामपंचायत चे माजी सरपंच भाऊभाई पाटील , भाजपा जिल्हा सरचिटणीस जितेंद्रे जमदाडे, नगरसेविका विद्या जमदाडे , भाजपा शहराध्यक्ष विनोद जैन , भाजपा महिलाध्यक्षा किन्नरी सोनार , भाजपा शहर उपाध्यक्ष जयेश देसाई, भाजपाचे ,मिलिंद भावसार, प्रशांत कुलकर्णी, निहाल पठाण, डॉ. विभांडीक ,सेवानिवृत्त मुख्याध्यापक मगन शिरसाट, पत्रकार बापू घोडराज ,नरेंद्र कुवर, ईश्वर बैसाणे,शांतीलाल अहिरे, राजेंद्र आगळे,रमेश बर्डे,विवेक पिंपळे ,सचिन जाधव, मिलिंद शिरसाट, संतोष कुवर, चंद्रविलास बि-हिडे, मिलिंद बागले ,शेखर गवळे, शिवदास बैसाणे,सचिन जाधव, छायाबाई जाधव, निशा अहिरे, पितांबर बैसाणे, अभिजित रामराजे , शरदा पाटिल ,विकास झाल्टे आदी उपस्थित होते.सुत्रसंचालन व आभार केंद्रप्रमुक नरेंद्र महिरे यांनी मानले.








