Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

team by team
May 30, 2025
in राजकीय
0
वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह जयंती निमित्त नंदनगरीत भव्य मिरवणूक

नंदुरबार l प्रतिनिधी

थोर योद्धा, वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या 485 व्या जयंतीनिमित्त श्री महाराणा प्रताप युवक मंडळ आणि समस्त राजपूत समाजातर्फे भव्य मिरवणूक काढण्यात आली. विविध कसरती, नृत्य आणि देखाव्यांनी नंदनगरीवासियांचे लक्ष वेधले होते.

गुरुवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास चैतन्य चौकातून मिरवणुकीस प्रारंभ झाला. सजविलेल्या बग्गी रथातून सजीव देखावा साकारण्यात आला. यावेळी हिरामण पाटील या युवकाने महाराणा प्रतापसिंह यांची वेशभूषा परिधान केली होती. याचबरोबर अग्रभागी आदिवासी ढोल नृत्य पथक तसेच नाशिक येथील मशालधारी युवतींचे पथक लक्षवेधी ठरले. भगवे ध्वज, अश्वधारी घोडेस्वार युवक तसेच महिला मोठ्या संख्येने मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल ताशांचा गजर आणि डीजेच्या तालावर श्री महाराणा प्रतापसिंह जयंती मिरवणुकीस प्रारंभ झाला.

सिद्धिविनायक चौक आणि सुभाष चौकात पिंपळनेर व नाशिक येथील पथकाने अद्भुत कसरतींचे प्रदर्शन केले. वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांच्या शौर्यगाथेचे गीत आणि हर हर महादेवच्या जयघोषाने परिसर दुमदुमुन होऊन गेला होता. महाराणा प्रताप युवक मंडळाचे अध्यक्ष मोहिनीराज राजपूत यांच्या नेतृत्वाखाली उत्सव समितीचे अध्यक्ष मोहित राजपूत, अजयसिंग राजपूत, ॲड. अविनाश पाटील आणि समाज बांधवांनी संयोजन केले.

चैतन्य चौक,काका गणपती, देसाईपुरा, सिद्धिविनायक चौक, मंगळ बाजार, सुभाष चौक, जुनी नगरपालिका, आमदार कार्यालय, शिवसेना भवन, पंडित दीनदयाल चौक, डी. आर. हायस्कूल मार्गे महाराणा प्रतापसिंह पुतळा परिसरात मिरवणूक पोहोचली. महाराणा प्रताप चौकात पूर्णाकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. त्यानंतर महाप्रसाद वितरणाने मिरवणुकीचा समारोप झाला. मिरवणूक मार्ग दरम्यान शहर पोलीस ठाणे तसेच वाहतूक शाखा कर्मचाऱ्यांनी बंदोबस्त ठेवला.

बातमी शेअर करा
Previous Post

तोरणमाळ विकासाचा प्रस्ताव पाठवा; पर्यटन मंत्री शंभूराज देसाई

Next Post

आपत्कालीन यंत्रणांनी सतर्क राहून आपली कामे करावित;कुचराई करणाऱ्या विभाग प्रमुखांवर जबाबदारी निश्चित करणार : डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add