नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील मजूर स्थलांतर शून्य स्तरावर आणण्याचे उद्दिष्ट ठेवून स्थलांतर होणाऱ्या भागातील ग्रामस्थांचा सहभाग असलेले बचत गट मोठ्या संख्येने स्थापन करणे, त्यांना कुक्कुटपालन शेती प्रक्रिया उद्योग आणि तत्सम लघु उद्योगासाठी प्रोत्साहित करणे तसेच केंद्रीय अर्थसहाय्य योजनेतून अधिकाधिक लाभ मिळवून देणे; अशा स्वरूपात विविध योजनांच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देण्याचे भरीव कार्य खासदार असताना संसद रत्न डॉक्टर हिना गावित यांनी केले आहे.
त्याच पद्धतीने रोजगार देण्याचे काम त्यांनी अद्यापही सुरू ठेवले असून त्याच अंतर्गत आज दिनांक 23 मे 2025 रोजी नंदुरबार जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागांतर्गत शेषनिधीतून धीरजगाव येथील दिव्यांग लाभार्थी योगेश धरमसिंग वळवी यांना संसदरत्न मा.खासदार डॉ.हिना विजयकुमार गावित यांच्याहस्ते आटा चक्कीचे वितरण करण्यात आले. केंद्र सरकार आणि राज्य सरकार सातत्याने रोजगार निर्मितीच्या दृष्टिकोनातून युवकांसाठी विविध योजना देत असते त्याचा आपण लाभ घेतला पाहिजे नंदुरबार लोकसभा मतदारसंघातील बेरोजगार युवकांना आधार देण्यासाठी आपण सदैव सज्ज आहोत, त्यांनी योजनांचा लाभ घ्यायला पुढे यावे; असे आवाहन डॉक्टर हिना गावित यांनी याप्रसंगी केले.
या प्रसंगी बंजारा क्रांती दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष श्रावण चव्हाण,धीरज गावचे सरपंच अशोक वळवी, सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र पवार,जगदीश पाटिल, संत सेवालाल महाराज तांडा समृद्धी योजनेचे जिल्हास्तरीय अशासकीय सदस्य प्रेम चव्हाण, भवालीचे सरपंच गोविंद नाईक, रोहित पवार, पुरुषोत्तम चव्हाण, राजू पवार, किशोर पवार, भोलेनाथ वळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.