Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते प्रतापपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन

team by team
October 18, 2021
in आरोग्य
0
पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी यांच्या हस्ते प्रतापपूर येथील आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन
नंदुरबार l प्रतिनिधी
 राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड.के.सी.पाडवी यांच्या हस्ते तळोदा तालुक्यातील प्रतापपूर येथे उभारण्यात आलेल्या नुतन आरोग्यवर्धिनी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी जि.प.अध्यक्षा ॲड.सीमा वळवी, आमदार राजेश पाडवी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पाटील, माजी मंत्री पद्माकर वळवी, समाजकल्याण सभापती रतन पाडवी, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तहसिलदार गिरीष वखारे, जिल्हा साथ रोग अधिकारी एन.एल.बावा, पंचायत समिती उपसभापती लता वळवी, जि.प.सदस्य सुहास नाईक, हेमलता शितोळे, सुनिता पवार, संगीता वळवी आदी उपस्थित होते.
ॲड.पाडवी म्हणाले, प्रतापपूर उपकेंद्रास आजूबाजूची 45 गावे जोडलेली असल्याने या आरोग्यवर्धंनी केंद्राचा परिसरातील 48 हजार नागरिकांना लाभ होणार आहेत. या परिसरातील नागरिकांना आरोग्य सेवा देणारी हे सर्वात मोठे आरोग्यवर्धंनी केंद्र आहे. या आरोग्यवर्धंनी केंद्रामुळे या गावांमधील नागरिकांना  चांगल्या आरोग्याच्या चांगल्या सोईसुविधा उपलब्ध होतील.
जिल्ह्यातील जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यासाठी जास्तीत जास्त निधी जिल्ह्यास देण्यात येत असून त्यातून दर्जेदार कामे करण्यात यावीत. दुर्गम भागातील नागरिकांना उपचारासाठी तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते त्यामुळे आरोग्य विभागाने याठिकाणी विशेष शिबीराचे आयोजन करण्याची सुचना केली. या आरोग्यवर्धंनी केंद्राच्या वाढीव बांधकामासाठी 1 कोटी रूपयांचा निधी देण्यात येईल, त्यासाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. तसेच रुग्णांना उपचारास नेण्याकरीता या आरोग्य केंद्रास एक रूग्णवाहिका देण्याबाबतही आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.
जि.प.अध्यक्षा श्रीमती वळवी म्हणाल्या, या भागातील नागरिकांच्या उपचारासाठी सुसज्ज अशी इमारत निर्माण केली असून नागरिकांना येथे चांगल्या आरोग्य सुविधा मिळेल. अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केंद्रातील सुविधांचा नागरिकांसाठी क्षमतेने उपयोग करावा. प्रत्येकांने आपल्यावर सोपविलेली जबाबदारी व्यवस्थितपणे पार पाडावी.
आमदार राजेश पाडवी म्हणाले की, नूतन इमारतीमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. ग्रामीण भागातील जनतेला वेळेवर आरोग्य सुविधा देण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र महत्वाचे आहे. येथील कर्मचाऱ्यांनी नागरिकांना चांगल्या सुविधा द्याव्यात.
राष्ट्रीय आरोग्य अभियानातंर्गत हे प्राथमिक आरोग्यवर्धनी केंद्र उभारण्यात आले असून त्यावर 2 कोटी 14 लाख रुपये खर्च करण्यात आले आहे. याठिकाणी पॅथॉलॉजी लॅब, प्रसूतीगृह, शस्त्रक्रीया कक्ष, रेकार्ड रुम, पुरुष महिला कक्ष, औषध भांडार आदी सुविधा येथे उपलब्ध असतील, अशी  माहिती डॉ. चव्हाण यांनी यावेळी दिली. यावेळी परिसरातील नागरिक तसेच लोकप्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बातमी शेअर करा
Previous Post

नागरिकांना दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्धतेसाठी प्रयत्नशील : पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी

Next Post

शहादा येथील पंचशील परिसरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते काँक्रिटीकरण रस्त्याचे भुमिपुजन

Next Post
शहादा येथील पंचशील परिसरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते काँक्रिटीकरण रस्त्याचे भुमिपुजन

शहादा येथील पंचशील परिसरात आमदार राजेश पाडवी यांच्या हस्ते काँक्रिटीकरण रस्त्याचे भुमिपुजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय शांतता समितीची बैठक

March 18, 2026
दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

दिव्यांग लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ, 20 मार्चपर्यंत कागदपत्रे सादर करावे

March 18, 2026
पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

पाणी पुरवठा योजनेच्या शाश्वततेसाठी ग्रामस्थांमध्ये स्वमालकीची भावना गरजेची : आ.आमश्या पाडवी

March 18, 2026
आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add