नंदुरबार l प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने सदस्य़ नोंदणी अभियान राबवण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सज्ज़ व्हावे. पक्ष मजबूतीसाठीच नंदुरबार जिल्हयाचे पालकमंत्रीपद राष्ट्रवादीकडे राखून ठेवण्यात आले. कार्यकर्ते,पदाधिकाऱ्यांनी खचून न जाता पक्ष मजबूतीसाठी कामाला लागावे. यापुढे कुठलीही अडचण येणार नाही,याची काळजी घेतली जाईल. शासकीय योजनांच्या माध्यमातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोहचवा.यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांने कामाला लागावे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य़ संस्थांच्या निवडणूकीसाठी सर्वांनी कामाला लागावे,असे आवाहन राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेस मेळाव्याला संबोधित करतांना केले.
मदर टेरेसा हायस्कूलच्या सभागृहात पार पडलेल्या राष्ट्रवादी युवक काँग्रेस जोडो अभियान 2025 प्रसंगी ते बोलत होते.यावेळी अमर पाटील, रणजित नरुटे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष सीताराम पावरा,भरत गावित,रतन पाडवी, मोहन शेवाळे, मोहन माळी, मधूकर पाटील, राजेंद्र बाविस्क़र, शरद पाटील, धनंजय गावित ,सितासंराम पावरा, पुष्पा गावित, यशवंत ठाकरे, संदीप वळवी, दिपक वळवी, सागर मराठे, प्रशांत पटले, अनिल भिल, सुरेंद्र कुवर,छोटू कुंवर, संतोश पराडके, डॉ नितीन पवार, प्रकाश भोई, अनिल चौधरी, सोयेब खाटीक, प्रतिभा कुळकर्णी,अविनाश गावित, अनिल पगारे,मोहन ढोले, जितेंद्र कोकणी, अशोक तडवी, सिकंदर कुरेशी, इम्राण काकर, अजरमिया जहाँगरिदार,इम्रान भाई उर्फ गुडडुभाई शेख, सारांश भावसार, गोविंद शेवाळे, रणसिंग पाडवी आदी मान्यंवर उपस्थित होते.
सुरज चव्हाण म्हणाले, मेळाव्यात अनेकांनी तक्रार वजा विनंती केली,यापुढे पदाधिकाऱ्यांची कुठलीही तक्रार येणार नाही,याची दखल घेतली जाईल.येणाऱ्या काळात स्वानिक स्वराज्य़ संस्थांच्या निवडणूका लढविण्यासाठी पक्ष पातळीवर जी मदत हवी असेल ती दिली जाईल. जि प,नगर पालिका व ग्राम पंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा फडकवण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल,असेही त्यांनी सांगितले.लवकरच पालकमंत्री व आदिवासी विकास मंत्री यांच्या उपस्थितीत नंदुरबार जिल्हयात भव्य़ मेळावा घेण्यात येवून पक्ष संघटन मजबूतीसाठी प्रयत्ऩ केले जातील.आदिवासी राज्य़मंत्री पद असो किंवा आदिवासी विकास मंत्रीपद असो ही दोन्हीही पदे आपल्या पक्षात असल्याने या भागातील आदिवासींचे प्रलंबित प्रश्ऩ सोडविण्यावर प्रामुख्याने भर देण्यात येईल.,असे चव्हाण यांनी सांगितले.
डॉ अभिजित मोरे म्हणाले, धर्म ही अफूची गोळी आहे.सर्व धर्म समभाव हा सेक्यूलर विचार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अंमलात आणते.हे आजच्या पिढीसाठी आव्हानात्म़क आहे. पक्ष प्रमुखअजितदादा पवार यांनी कधीही युवकांचे माथे भडकवण्याचे काम कधी केले नाही.केवळ विकासासाठी झटणारे दादा अशीच प्रतिमा त्यांनी निर्माण केली.
धनंजय भरत गावित, भरत गावित,मोहन शेवाळे, मोहन माळी आदींनी मनोगत व्यक्त़ केले. सिताराम पावरा यांनी प्रास्ताविक केले तर रणजित राजपूत यांनी सुत्रसंचालन केले.मधूकर पाटील यांनी आभार मानले.