नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील खोक्राळे येथील माध्यमिक विद्यालयाचा इ.दहावीची परीक्षा मार्च २०२५ चा निकाल जाहीर झाला असून एकूण १९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
एस.एस.सी. फेब्रुवारी / मार्च २०२५ चा
निकाल ९०.४७ टक्के लागला असून
प्रथम क्रमांक ज्ञानेश्वर सुनील धनगर
८४ टक्के,द्वितीय क्रमांक नंदिनी जितेंद्र राजपूत
८२.४० टक्के तृतीय क्रमांक राधिका रामसिंग महाले ८१.२० टक्के मिळवत यश संपादन केले.
सदर उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील,कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील,सचिव,सर्व संचालक मंडळ मुख्याध्यापक एस .जी. सैंदाणे,सर्व शिक्षक -शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.