नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पु. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाचा इयत्ता दहावीची परीक्षा मार्च २०२५ चा निकाल जाहीर झाला असून एकूण ५८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
माध्यमिक विद्यालयाचा निकाल निकाल ९६.६६ टक्के लागला असून प्रथम क्रमांक रोहित दिलीप बोरसे ८५.४० टक्के,द्वितीय क्रमांक गायत्री संभाजी बोरसे ८४.२० टक्के,तृतीय क्रमांक सना जयनुल खाटीक ८३.८० टक्के,चतुर्थ क्रमांक जानवी पंढरीनाथ माळी ८३.६० टक्के,पाचवा क्रमांक धनश्री योगेश पाटील ८३ टक्के मिळवून
उत्तीर्ण झाले.
सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील,कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव,सर्व संचालक मंडळ, प्राचार्या, पर्यवेक्षक, प्राध्यापक, शिक्षक – शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.