Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

युवकाचा मृत्यू, वायरमनला न्यायालयाने ठोठावली 10 वर्षांची शिक्षा

team by team
May 14, 2025
in क्राईम
0
युवकाचा मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या एकास पाच वर्ष सश्रम कारावास

नंदुरबार l प्रतिनिधी-

तरुणास इलेक्ट्रिक पोलवर चढवून त्याच्या मृत्युस कारणीभुत असणाऱ्या अमळथे येथील वायरमनला न्यायालयाने 10 वर्ष शिक्षा व 25 हजारांचा दंड ठोठावला आहे.

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीतील अमळथे गावातील फिर्यादी नामे दिपक दरबारसिंग गिरासे यांचे शेताजवळ रस्त्यावर असलेला विजेचा जुना ट्रान्सफार्मर खराब झाल्याने दि. 14/01/2022 रोजी दुपारी शरद जाधव (वायरमन) वय-41 रा. खोंडामळी ता. जि. नंदुरबार हा नवीन ट्रान्सफार्मर बसविणेकरीता शेतात दोन व्यक्तिसोबत आला होता तेव्हा तेथे आजुबाजूचे इतर 7 ते 8 शेतकरी देखील मदतीकरीता उपस्थित होते.

सर्वांनी मिळून विजेचा जुना ट्रान्सफार्मर उतरवून नवीन ट्रान्सफार्मर बसविला होता. त्यानंतर ट्रान्सफार्मरला झंपर जोडण्याकरीता वायरमन शरद जाधव याने कोपलीं सबस्टेशनला हजर असलेले ऑपरेटर ललित किशोर चंदने यास फोनव्दारे लाईट बंद करण्याच्या सूचना केल्या होत्या,

लाईट बंद झाल्यानंतर वायरमन शरद जाधव यांनी फिर्यादी यांचा भाऊ पंकज दरबारसिंग गिरासे यास सदर विजकामाचे कोणतेही कौशल्य माहिती नसतांना तसेच कोणतेही सुरक्षेची साधने न देता पंकज यास इलेक्ट्रिक पोलवर झंपर जोडण्यासाठी चढण्यास सांगितले होते. त्यानंतर पोलवर चढून पंकजने झंपरचे दोन फेज जोडले व तिसरा फेज जोडत असतांना त्यास इलेक्ट्रिक शॉक लागला व तो खांब्यावरच तारांना चिटकून मयत झाला होता. सदर घटना पाहून फिर्यादी व तेथील लोकांनी आरडाओरड केली असता वायरमन शरद जाधव हा त्याठिकाणाहून पळून गेला होता. त्याअन्वये नंदुरबार तालुका पोलीस ठाणे येथे गु.र.नं. 20/2022 भा.द.वि. कलम 304 प्रमाणे दि. 15/01/2022 रोजी आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नंदुरबार तालुका पोलीस ठाण्याचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक कमलाकर चौधरी यांनी सदर गुन्हयाचा तपासात आरोपी वायरमन शरद जाधव यास अटक करुन सदर गुन्ह्याचा अत्यंत शास्त्रोक्त पध्द्तीने तपास करीत महत्वाचे पुरावे जमा केले होते. तसेच गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोर्पीविरुध्द् मुदतीत दोषारोपपत्र सत्र न्यायालय, नंदुरबार येथे सादर केले होते.

सदर खटल्याची सुनावणी मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. जी. मलशेट्टी यांचे समक्ष झाली. सदर खटल्यामध्ये सरकार पक्षाचे वतीने साक्षीदार तपासण्यात आले. त्यात साक्षीदार, पंच व तपास अधिकारी यांच्या साक्ष महत्वाच्या ठरल्या आहेत. यावरुन सबळ पुराव्याचे आधारे आरोपी वायरमन शरद जाधव विरुध्द गुन्हा सिध्द झाल्याने त्यास मा. अति. जिल्हा व सत्र न्यायाधीश, आर. जी. मलशेट्टी, नंदुरबार यांनी भा.द.वि.क.-304 अन्वये दोषी ठरवत 10 वर्ष सश्रम कारावास व 25,000/- रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

सदर खटल्याचे कामकाज सरकारी पक्षाचे वतीने अति. सरकारी अभियोक्ता अॅड. तुषार कापडीया यांनी पाहिले असून पैरवी अधिकारी म्हणून पोउपनि सागर नांद्रे, पैरवी अंमलदार पोहेकों/नितीन साबळे, पोहेकों/ पंकज बिरारे, पोहेकॉ राजेंद्र गावीत आणि पोहेकों/शैलेंद्र जाधव यांनी कामकाज पाहीले आहे. तपास अधिकारी तसेच अति. सरकारी अभियोक्ता यांचे नंदुरबार जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस. अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे, उप विभागीय पोलीस अधिकारी, नंदुरबार संजय महाजन यांनी अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्ह्यातील जुन्या २७ लघु पाटबंधारे योजनांची दुरुस्ती करणार;जुन अखेर पुर्ण करुन शेतकऱ्यांना शेतावर पाणी पोहविण्याचे नियोजन

Next Post

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत भादवड विद्यालयाचे घवघवीत यश

Next Post
माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत भादवड विद्यालयाचे घवघवीत यश

माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेत भादवड विद्यालयाचे घवघवीत यश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add