Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

जिल्ह्यातील जुन्या २७ लघु पाटबंधारे योजनांची दुरुस्ती करणार;जुन अखेर पुर्ण करुन शेतकऱ्यांना शेतावर पाणी पोहविण्याचे नियोजन

team by team
May 14, 2025
in राज्य
0
जिल्ह्यातील जुन्या २७ लघु पाटबंधारे योजनांची दुरुस्ती करणार;जुन अखेर पुर्ण करुन शेतकऱ्यांना शेतावर पाणी पोहविण्याचे नियोजन

नंदुरबार l प्रतिनिधी

मृद व जलसंधारण विभागा अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात सुमारे ३०-३५ वर्षापासून जुन्या असलेल्या एकूण २७ लघु पाटबंधारे योजनांची दुरुस्ती करुन व बंद पडलेल्या पारंपरिक कालव्या ऐवजी भूमिगत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीद्वारे शेतकऱ्याच्या शेतात पाणी देण्याची महत्त्वाकांक्षी योजना राबवण्यात येत असून, त्या जुन अखेर पूर्ण करून शेतकऱ्यांच्या शेतावर थेट पाणी पोहोचविणार असल्याची माहिती मृद व जलसंधारण विभागाचे नाशिक प्रादेशिक जलसंधारण अधिकारी इंजि. हरिभाऊ गिते यांनी दिली आहे.

इंजि. हरीभाऊ गिते यांनी लघु पाटबंधारे योजना गढावली, पडळपूर व रोझवे ता. तळोदा या कामांची नुकतिच पाहणी केली. ह्या योजना जुन अखेर पुर्ण करुन शेतकऱ्यांना शेतावर पाणी पोहचले अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या योजनांवर पाणी वापर संस्था स्थापन केल्या जाणार असून, त्यांचे सक्षमीकरण करून त्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. पाणी वापर संस्थांकरिता इमारतींची उभारणी करण्यात येणार आहे. ज्या शेतात उभी पिके आहेत, तिथे खोदकाम करताना पिकांचे नुकसान न करता जमिनीतून बंदिस्त पाईप टाकण्यात येणार आहेत, असेही श्री. गिते यांनी यावेळी सांगितले.

पाहाणी दरम्यान जिल्हा जलसंधारण अधिकारी (मृद व जलसंधारण विभाग नंदुरबार) आर. एच. झुरावत, उपविभागीय जलसंधारण (नंदुरबार) अधिकारी, निलेश पाटील, शहादा उपविभागाचे उपविभाग श्रीनिवास पुरी, जलसंधारण अधिकारी तेजस रहाणे व कंत्राटदार लाभघारक शेतकरी उपस्थित होते.

*योजनांची वैशिष्ट्ये…*

• *गढावली लघुपाटबंधारे योजना*
काम पूर्ण वर्ष: 1988
पाणीसाठा: 940 घनमीटर
सिंचनाखाली येणारे क्षेत्र: 122 हेक्टर

• *पडळपूर लघुपाटबंधारे योजना*
काम पूर्ण वर्ष: 1994
पाणीसाठा: 1700 घनमीटर
सिंचनाखाली येणारे क्षेत्र: 225 हेक्टर

• *रोझवे लघुपाटबंधारे योजना*
काम पूर्ण वर्ष: 1997
पाणीसाठा: 1740 घनमीटर
सिंचनाखाली येणारे क्षेत्र: 363 हेक्टर

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा पोलीस अधीक्षकांनी दुर्गम भागातील आदिवासी युवकांशी साधला संवाद, करियर संदर्भात केले मार्गदर्शन

Next Post

युवकाचा मृत्यू, वायरमनला न्यायालयाने ठोठावली 10 वर्षांची शिक्षा

Next Post
युवकाचा मारहाण करुन मृत्यूस कारणीभूत ठरणाऱ्या एकास पाच वर्ष सश्रम कारावास

युवकाचा मृत्यू, वायरमनला न्यायालयाने ठोठावली 10 वर्षांची शिक्षा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add