नंदुरबार l प्रतिनिधी
मुंबई येथे राज्याचे मुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत तळोदा व शहादा येथील सरपंच,पंचायत समिती सदस्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी तीन मे रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष डॉ अभिजित मोरे यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश सोहळा संपन्ऩ झाला.
तळोदा पंचायत समितीचे माजी सभापती यशवंत रामसिंग ठाकरे, कन्साई गणाचे व शहादा पंचायत समितीचे सदस्य़ दिलीप आबला पावरा, रामदास ज्योतीसिंग वाघ, अल्पंसंख्यांक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष शोएब आसिफ खाटीक, मुज्जमील हुसैन, तळोदा पंचायत समितीच्या माजी सभापती रेखाबाई वसन पाडवी यांचे चिरंजीव सागर वसन पाडवी,राजु छोटु सोनवणे, गुलाबसिग शिवदास शेमळे, कुवरसिंग मोरे, मंगलसिंग वसावे, सुरुपसिंग गुलाब ठाकरे, मगन दिलीप पाडवी,
माजी सरपंच मोतीराम कामाजी गावित, वेस्ता वळवी , दगडू ठाकरे, विलास गावित, विनोद दिलवर गावित, मोतीराम विऱ्या पाडवी, उदेसिंग देवळा ठाकरे, कालूसिंग पाडवी,वासुदेव जंगल्या पाडवी, हुपसिंग सुरत्या नाईक आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.
यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार म्हणाले, नव्या व जुन्या कार्यकर्त्यांत भेदभाव न करता पक्षांसाठी सर्वांनी काम करायचे आहे.जो पक्षासाठी मनापासुन काम करेल,त्याला पक्ष संधी देईल,असे सांगत सर्व कार्यकर्त्यांना शुभेच्छा दिल्या.
यावेळी जि प चे माजी सदस्य़ मोहन शेवाळे,भरत गावित, रतनदादा पाडवी, नरेंद्र नगराळे, महिला जिल्हाध्य़क्षा सिमा सोनगरे, कार्याध्य़क्षा संगीता पाडवी, शहादा तालुका अध्यक्ष संतोष पराडके,छोटू कुंवर, गोविंद शेवाळे, रणसिंग पाडवी,शहादा तालुका युवा अध्यक्ष सागर मराठे, पुंडलिक राजपूत, सागर पाटील, कैलास चौधरी, वैशाली मनोज चौधरी,मोंटू जैन आदी मान्य़वर उपस्थित होते.