Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

team by team
May 9, 2025
in राजकीय
0
अवकाळी’मुळे झालेल्या नुकसानीचे ताबडतोब पंचनामे करून भरपाईची प्रक्रिया करा; डॉ. विजयकुमार गावित यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

नंदुरबार l प्रतिनिधी

जोरदार वादळी पावसामुळे कांदा उत्पादकांना जबर फटका बसलाच त्याचबरोबर आंबा मका केळी पपई व अन्य फळ उत्पादकांचे देखील प्रचंड नुकसान झाले असून काही घरांची पडझड झाली आहे. त्याचा आढावा घेत महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना तातडीने पंचनामा करून भरपाई मिळवून देण्याविषयी निर्देश दिले.

अधिक वृत्त असे की, 6 आणि 7 मे 2025 असे लागोपाठ दोन दिवस संपूर्ण जिल्ह्यासह नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील अनेक ठिकाणी जोरदार झालेल्या वादळी पावसाने तडाखा दिला. शेतकरी बांधव झोपेत असतानाच त्यांचे टनोगंती कांदे भिजून गेले. नंदुरबार आणि शहादा तालुक्यात यंदा नंदुरबार जिल्ह्यात कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात आले असून बहुतांश शेतकऱ्यांचा कांदा खळ्यात उघड्यावर आहे परिणामी अचानक आलेल्या पावसा मुळे शेकडो टन कांदा वाया जाण्याच्या स्थितीत आला. या नुकसानीमुळे शेतकरी हवालदिल झाला. नंदुरबार शहादा तळोदा आणि नवापूर तालुक्यात काढणीला आलेल्या पपई केळी आंबा कैरी मका आणि अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले.

दरम्यान, दिनांक 8 मे 2025 रोजी महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी अवकाळी ग्रस्त गावांमधील शेतीच्या नुकसानीची माहिती घेतली. अनेक शेतकरी बांधवांनी आपल्या व्यथा मांडल्या. दर काही महिन्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना अवकाळी पावसाच्या संकटाला सामोरे जावे लागत आहे याविषयी शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त होताना दिसली. त्याचा आढावा घेत महाराष्ट्राचे माजी आदिवासी विकास मंत्री तथा आमदार डॉक्टर विजयकुमार गावित यांनी नंदुरबार आणि शहादा तालुक्यातील तहसीलदार व संबंधित अधिकारी यांना तातडीने पंचनामा करून भरपाई मिळवून देण्याविषयी निर्देश दिले.

बातमी शेअर करा
Previous Post

बारा बलुतेदार समाजाने शिवसेनेशी जुळवून विकास साध्य करावा : प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब किसवे

Next Post

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

Next Post
पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

पावसाळी आपत्ती व्यवस्थापनासाठी सर्व यंत्रणांना सज्ज राहण्याचे : डॉ. मित्ताली सेठी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आरटीओची  रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

आरटीओची रिक्षांवर कारवाई; शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी यांची मध्यस्थी

March 14, 2026
अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरीची शिक्षा

March 14, 2026
नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

नवापुर एमआयडीसीत बनावट तूप कारखान्यावर छापा; दीड कोटींचा मुद्देमाल जप्त

March 14, 2026
जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

जिल्ह्यात गॅस आणि इंधनाचा मुबलक साठा,नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये : धनंजय गोगटे

March 14, 2026
वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

वन कायद्यांचा अडसर दूर करून देव मोगरा माता मंदिर परिसरातील विकासाला गती देणार : डॉ. हिना गावित

March 14, 2026
पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

पालिकेतर्फे महिला मेळावा; बचत गटांना धनादेश वितरणासह गुणवंतांचा सन्मान

March 10, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add