नंदुरबार l प्रतिनिधी
भालेर येथील श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भालेर तालुका जिल्हा नंदुरबार इ. १२ वी परीक्षा २०२५ चा निकाल ८९.४७ टक्के जाहीर झाला असून एकूण ६८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
प्रथम क्रमांकाने पाटील नंदनी मुरलीधर 82.50 टक्के द्वितीय मोरे कमलेश अनिल ८२.१७ टक्के,तृतीय पाटील चेतना कैलास ७८.६७ टक्के तसेच चतुर्थ जाधव तुलसी दिलीप ८७.१७ ,टक्के, पाचवी सोनार कोमल भिका ७७.६७ टक्के मिळवून उत्तीर्ण झाले.
विद्यार्थ्यांचे काकेश्वर विद्या प्रसारक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव,सर्व संचालक, प्राचार्या, पर्यवेक्षक, प्राध्यापक प्राध्यापिका, शिक्षक – शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.