नंदुरबार l प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जळगाव व महाराष्ट्र राज्य शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक संघटनेच्या संयुक्त विद्यमाने “नाशिक विभागीय आदर्श मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक पुरस्कार सोहळा” गोदावरी फाऊंडेशनच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये मोठ्या उत्साहात पार पडला.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आमदार प्रा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा क्रीडा अधिकारी रविंद्र नाईक, विद्यापीठाचे क्रीडा संचालक डॉ. दिनेश पाटील, व इतर मान्यवर उपस्थित होते.
जळगाव, धुळे, नंदुरबार व नाशिक या चार जिल्ह्यांतील गुणवंत मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षकांना विभागीय आदर्श पुरस्काराने गौरविण्यात आले. शिक्षण क्षेत्रासोबत क्रीडा क्षेत्राला सतत सहकार्य करून जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रात विविध उपक्रमांमध्ये महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणारे मुख्याध्यापक व क्रीडाशिक्षक यांना हे विभागीय पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.
नंदुरबार जिल्ह्यातील विभागीय आदर्श मुख्याध्यापक पुरस्कारप्राप्त:
सुषमा शाह (मुख्याध्यापिका – श्रीमती ही. गो .श्रॉफ हायस्कूल नंदुरबार नूतनवर्षा वळवी (मुख्याध्यापिका- एस.ए.मिशन हायस्कूल, नंदुरबार),नंदुरबार जिल्ह्यातील विभागीय आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कारप्राप्त:
युवराज पाटील (क्रीडाशिक्षक – कुबेर माध्यमिक विद्यालय, म्हसावद, ता. शहादा) जगदीश बच्छाव (क्रीडाशिक्षक डी.आर.हायस्कूल, नंदुरबार) पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक यांचे नंदुरबार जिल्हा शारीरिक शिक्षण व क्रीडा शिक्षक महासंघाचे अध्यक्ष सुनील सूर्यवंशी, सचिव मीनल वळवी, उपाध्यक्ष शैलेंद्र रघुवंशी, कार्याध्यक्ष पंकज पाठक, डॉ.मयुर ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे.