नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील श्रीमती क.पू .पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थिनीचे नवोदय निवड परीक्षेत घवघवीत यश प्राप्त केले आहे.
श्रीमती क.पू. पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील इयत्ता पाचवीतील विद्यार्थिनी प्रज्ञा संतोष बिरारे जवाहर नवोदय प्रवेश सन २०२५-२६ साठी परीक्षेत उत्तीर्ण झाली.
का. वि. प्र. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष भास्करराव हिरामण पाटील, कार्याध्यक्ष विजय पाटील, उपाध्यक्ष चंद्रशेखर पाटील, सचिव भिका पाटील, प्राचार्य सौ.विघा बी. चव्हाण पर्यवेक्षक .एम.बी.अहिरे प्राध्यापक, प्राध्यापिका, शिक्षक शिक्षिका ,शिक्षकेत कर्मचारी वृंद यांनी उत्तीर्ण विद्यार्थ्यांनीचे अभिनंदन व कौतुक केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. या विद्यार्थिनीला मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षक शिक्षिका ए.व्ही. कुवर, सौ. सी.व्ही.पाटील, सौ.एस. पी. पाटील यांचे अभिनंदन केले.