नंदुरबार l प्रतिनिधी
संसद रत्न मा. खासदार डॉक्टर हिना गावित यांच्या हस्ते नंदुरबार येथील स्पर्श हॉस्पिटल येथे नव्याने सुरू करण्यात आलेल्या आय व्ही एफ तंत्रज्ञाना चा शुभारंभ करण्यात आला. डॉक्टर प्रशांत ठाकरे आणि संबंधित तंत्रज्ञ व मान्यवर उपस्थित होते. वंध्यत्व दूर सारणारे हे तंत्रज्ञान असून स्पर्श हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रथमच उपलब्ध झाले आहे.
नंदुरबार येथील डॉक्टर प्रशांत ठाकरे यांच्या स्पर्श हॉस्पिटल या ठिकाणी आईवीएफ या नवीन तंत्रज्ञानाची सुरुवात गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर करण्यात आली. त्या कक्षाचे उद्घाटन केल्यानंतर डॉक्टर हिना गावित यांनी शुभेच्छा दिल्या आणि आपल्या जिल्ह्यातील गरीब गरजू दाम्पत्यांची अपेक्षापूर्ती करणारे कार्य देखील केले जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली.
इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF), एक प्रकारचे सहाय्यक पुनरुत्पादक तंत्रज्ञान (ART) आहे. याचा वापर वंध्यत्वाच्या समस्या असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी केला जातो. हे तंत्रज्ञान उपलब्ध करून देणारे स्पर्श हॉस्पिटल हे नंदुरबार जिल्ह्यातील पहिले रुग्णालय आहे.
पूर्वी त्याची फक्त फ्रेंचाईजी एका मोठ्या हॉस्पिटलकडून त्यांनी घेतलेली होती. ज्या कपल्सला मुलं होत नाही तर ते आर्टिफिशियल पद्धतीने मुलांना जन्म देण्याची ही एक आधुनिक पद्धत आहे ivf इन विट्रो फर्टीलायझेशन असं तिला म्हटलं जातं. याप्रसंगी डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की, सध्या सर्वच शहरांमध्ये वंध्यत्वाचा सामना करणारे दांपत्य आढळून येतात. आपल्या जिल्ह्यातील अशा अनेक जोडप्यांना त्याचा नक्कीच पुढच्या काळामध्ये फायदा होईल. यावेळी डॉक्टर प्रशांत ठाकरे, डॉक्टर प्रीती ठाकरे आदी उपस्थित होते.