नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात इयत्ता पाचवीत शिकणारा धीरज प्रवीण कदमबांडे या विद्यार्थ्याने नवोदय परीक्षेत यश संपादन केले व तो या विद्यालयाच्या प्रवेशासाठी पात्र झाला.
त्याच्या यशाबद्दल नंदुरबार तालुका विधायक समितीचे चेअरमन आ.चंद्रकांत रघुवंशी,व्हा.चेअरमन मनोज रघुवंशी, सरचिटणीस यशवंत पाटील, संस्थेचे अधीक्षक पुष्पेन्द्र रघुवंशी, मुख्याध्यापक आर.एच. बागुल, पर्यवेक्षक व्ही.जे.पाटील यांनी अभिनंदन पर कौतुक केले.
धीरजला एस. एन. साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
धीरजच्या यशस्वीते बद्दल शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर बंधू-भगिनी यांनी अभिनंदन केले.