नंदुरबार l प्रतिनिधी
शहादा तालुक्यातील बामखेडा येथे विना परवाना पापड मसाला उद्योग केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाने तपासणी करून नऊ लाख ४८ हजार ९३७ रुपये किंमतीचा मसाला जप्त केला. उद्योग बंद करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहेत.
शहादा तालुक्यातील बामखेडा येथे धनंजय पापड नावाचा पापड मसाला उद्योग सुरू होता. याबाबत अन्न व औषध प्रशासन विभागाला माहिती मिळाली. त्यांनी तपासणी केली असता उद्योग विना परवाना सुरू असल्याचे स्पष्ट झाले. पथकाने पापड मसालाचे सहा नमुने विश्लेषणासाठी घेतले आहेत.एकुण सहा हजार ९७१ किलो किंमतीचा नऊ लाख ४८ हजार ९३७रुपयांचा साठा जप्त केला. मालक केशव मोहन पटेल, रा. बामखेडा यांना उद्योग तातडीने बंद करण्याचे निर्देश दिले. अन्न नमुने तपासणीनंतर अहवाल प्राप्त होताच कारवाई केली जाणार आहे.
ही कारवाई सहायक आयुक्त एस.एस.देवरे, अन्न सुरक्षा अधिकारी आ.भा.पवार, म.ब. भावसार, म.ना.चौधरी यांनी केली.दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी शहादा येथे आयुर्वेदीक औषधी बनविण्याच्या कारखान्यावरही कारवाई करून सील करण्यात आले होते.