शहादा l प्रतिनिधी-
तळागळातील महिलांपर्यंत ही योजना पोहोचवण्यासाठी संसदेमध्ये सातत्याने मागणी करत चुलीवर स्वयंपाक करणाऱ्या महिलांचे घर धूरमुक्त घर व्हावे यासाठी उज्ज्वला गॅस योजना पुन्हा सुरू झाली आहे . प्रत्येकाला गॅस जोडणी देण्यात येणार आहे असे प्रतिपादन खासदार डॉ . हिना गावित यांनी केले . हिंगणी , ता . शहादा येथे प्रधानमंत्री उज्ज्वला २ योजनेंतर्गत गॅस वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या .
कार्यक्रमास आमदार डॉ . विजयकुमार गावित , जिल्हा परिषद सदस्या सुप्रिया गावित , ऐश्वर्या रावल जि.प.चे माजी उपाध्यक्ष जयपालसिंह रावल , भाजपचे डॉ . कांतीलाल टाटिया , पंचायत समिती सदस्य अरुण पवार , गिरीश जगताप , के.डी. नाईक , हिंगणी सरपंच संगीता पवार , उपसरपंच सुनील भिल , चंद्रकांत पाटील , वसंत चौधरी , सरपंच मनोज चौधरी , मनीष गरुड , मणिलाल पाटील , ईश्वर माळी , अशोक पाटील , उपसरपंच राकेश पाटील , सुनील धनगर उपस्थित होते .
पुढे बोलताना खा.डॉ . हिना गावित यांनी बचत गटातून महिलांना स्वयंम रोजगार उपलब्ध व्हावा , महिला सक्षम व्हाव्यात यासाठी प्रयत्न आहे . केंद्रातल्या विविध योजना महिलांसाठी राबवणार असल्याचे सांगितले . आमदार डॉ . विजय गावित , डॉ . टाटिया यांनीही मनोगत व्यक्त केले . प्रास्ताविक चंद्रकांत पाटील यांनी केले . सूत्रसंचालन कचरू अहिरे , तर आभार एम . टी . मराठे यांनी मानले . बापू कोळी , नीलेश पाटील , भैया माळी यांनी परिश्रम घेतले .








