नंदुरबार l प्रतिनिधी
माजी आदिवासी विकास मंत्री आमदार डॉ विजयकुमार गावित यांनी आज तालुक्यातील नटावद या आपल्या मूळ गावी त्याचबरोबर देवपूर या गावी होलिकोत्सव साजरा केला. याप्रसंगी प्रथेनुसार विधिवत पूजन करून आणि नैवेद्य अर्पण करून त्यांनी होळीला प्रार्थना केली व प्रज्वलित केले.
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा तथा विद्यमान सदस्य कुमुदिनी गावित, माजी खासदार डॉ.हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी पंचायत समिती सभापती प्रकाश गावित, यांच्यासह देवपूर व नटावद गावातील ग्रामस्थ उपस्थित होते. होळी पूजनानंतर डॉक्टर विजयकुमार गावित यांनी उपस्थित ग्रामस्थांना शुभेच्छा दिल्या तसेच ग्रामस्थांसमवेत थांबून संवाद करीत आनंद घेतला.
याप्रसंगी उपस्थित आदिवासी महिला भगिनींनी पारंपारिक आदिवासी होळी गीतांचे गायन केले. दरम्यान, आपल्यातील वाईट विचार आपले जीवनातील दुःख यांचे दहन होऊन प्रत्येकाच्या जीवनात शांती सुख समृद्धी येवो त्याचप्रमाणे विविध रंगी आनंद आणि चैतन्य आपल्याला अखंड लाभत राहो, ही प्रार्थना! अशा शब्दात नंदुरबार जिल्ह्यातील समस्त जनतेला आमदार डॉक्टर विजयकुमार गावित, मा खासदार डॉक्टर हिना गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रिया गावित यांनी शुभेच्छा दिल्या.