नंदुरबार l प्रतिनिधी
शासनाच्या आरोग्य विभागामार्फत 1 ते 31 मार्च या कालावधीत राष्ट्रीय बाल स्वास्थ कार्यक्रम 2.0 हा सुरु असून या कार्यक्रमाअंतर्गत प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व आश्रमशाळेतील बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येत असल्याचे, जिल्हा शल्य चिकित्सक के.डी. सातपुते यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.
या मोहिमेअंतर्ग 0 ते 18 वयोगटातील मुलांची आरोग्य तपासणी, किरकोळ आजारांवर उपचार, विशेष आजारांवर मुलांना संदर्भसेवा देणे, तसेच जन्मजात व्यंग, शारिरीक कमतरता, आजार व विकासात्मक विलंब शोधून त्यांना निदान उपचार व मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
आरोग्य तपासणीसाठी तालुकानिहाय वैद्यकीय पथके…
*नंदुरबार तालुक्यासाठी-* नंदुरबार-2, ग्रामीण रुग्णालय रनाळा-1, ग्रामीण रुग्णालय धानोरा-1, व ग्रामीण रुणालय खोंडामळी-1.
*अक्कलकुवा तालुक्यासाठी-* ग्रामीण रुग्णालय अक्कलकुवा-3, ग्रामीण रुग्णालय जमाना-1, ग्रामीण रुग्णालय मोलगी-1.
*नवापूर तालक्यासाठी-* उप जिल्हा रुग्णालय नवापूर-2, ग्रामीण रुग्णालय विसरवाडी-1 व ग्रामीण रुग्णालय खांडबारा-1.
*धडगांव तालुक्यासाठी-* ग्रामीण रुग्णालय धडगांव-3 व ग्रामीण रुग्णालय तोरणमाळ-1.
*तळोदा तालुक्यासाठी-* उप जिल्हा रुग्णालय तळोदा-2.
*शहादा तालुक्यासाठी-* ग्रामीण रुग्णालय शहादा-4 व ग्रामीण रुग्णालय म्हसावद-2.
या पथकांमार्फत प्रत्येक तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा, अंगणवाडी व आश्रमशाळेतील बालकांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात येत आहे.