नंदुरबार l प्रतिनिधी-
भारतीय जनता पार्टी जिल्हा नंदुरबार युवा मोर्चातर्फे अपघातात मृत्यू पावलेल्या युवा मोर्चाच्या 2 पदाधिकाऱ्यांच्या कुटुंबियांना भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते आर्थिक मदत करण्यात आली.
यूवा मोर्चाचे जिल्हा चिटणीस अश्विन सोनार व शहरउपाध्यक्ष सागर सोनार यांचा काही महिन्यापूर्वी अपघाती मृत्यू झाला होता. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली होती. अश्विन सोनार व सागर सोनार यांच्या कुटुंबियांना मदत केली पाहिजे अशा विषय पुढे आला होता यासंदर्भात युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील व त्यांच्या टीमने अथक परिश्रम घेतले. तसेच युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या टीमने देखील आर्थिक मदत केली व जिल्हा भरातुन स्वईच्छेने भाजपा पदाधिकाऱ्यांनीही आर्थिक मदत केली. त्याअनुषंगाने 1 लाख 51 हजार चा निधी संकलित करून भाजपा जिल्हाध्यक्ष विजय चौधरी यांच्या हस्ते अश्विन सोनार यांची पत्नी मयुरी अश्विन सोनार व वडील प्रकाश सोनार यांच्या उपस्थितीत 1लाखाचा रुपयांच्या धनोदश देण्यात आला. तसेच सागर सोनार यांच्या घरी जाऊन त्यांच्या मातोश्री सुलोचना सुधाकर सोनार व पत्नी निकीता सागर सोनार यांना 51 हजार देण्यात आला.या प्रसंगी भाजपा संघटन सरचिटणीस निलेश माळी, जिल्हा उपाध्यक्ष सदानंद रघुवंशी, जिल्हा कोषाध्यक्ष कमल ठाकूर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष हर्षल पाटील शहराध्यक्ष नरेंद्र माळी, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस कुणाल जैन, युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस निलेश चौधरी, युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष युवराज राजपुत, युवा मोर्चा शहराध्यक्ष जयेश चौधरी, शहर सरचिटणीस खुशाल चौधरी, युवा मोर्चा जिल्हा सचिव मयूर चौधरी, राजेंद्र सोनार, युवा मोर्चा प्रसिद्धीप्रमुख रोहित शुकला, विद्यार्थी संयोजक महेंद्र अहिरे उपस्थित होते.








