नंदुरबार l प्रतिनिधी
प्रधानमंत्री पोषणशक्ती योजनेअंतर्गत माता पालकांसाठी एस.ए.मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय नंदुरबार येथे माता पालकांसाठी पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
सदर स्पर्धेमध्ये माता पालकांनी अतिशय उत्स्फूर्त असा प्रतिसाद नोंदविला सप्टेंबर महिना हा संपूर्ण देशात पोषण माह म्हणून साजरा केला जातो विद्यार्थ्यांमध्ये जंक फूड खाण्याच्या सवयी मोठ्या प्रमाणावर वाढत आहेत त्यामुळे पौष्टिक तृणधान्याकडे दुर्लक्ष होऊन विद्यार्थ्यांची शारीरिक क्षमता कमी होऊन विद्यार्थी विविध आजारांना बळी पडत आहेत लहानपणापासूनच तृणधान्य कडधान्य यांची सवय विद्यार्थ्यांना लागावी व त्यांचे जीवन सुदृढ आरोग्य पूर्ण असावे व व तसेच आपला आहार कर्बोदके प्रथिने व जीवनसत्त्वांनी समृद्ध असणे आवश्यक आहे उद्देशाने तृणधान्यापासून निर्मित सकस व रुचकर पाककृती स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सौ आरती कांतीलाल पावरा यांनी तयार केलेल्या कॉर्न कटलेट विथ व्हेजिटेबल या पाककृतीने प्रथम क्रमांक मिळविला तर सौ रोहिणी रवींद्र बोरसे यांनी तयार केलेले मिश्र डाळीचे भाजीपाला घालून केलेले आप्पे या पदार्थाला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. सौ सुनीता कांतीलाल पावरा वाटाण्याच्या पुऱ्या व बीट कट शिरा या पाककृतीने तृतीय क्रमांक पटकावला.
सर्व सहभागी माता पालकांचे विद्यालयाच्या प्राचार्य सौ नूतनवर्षा वळवी यांनी स्वागत केले व उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल त्यांचे कौतुक केले.