नंदुरबार l प्रतिनिधी-
नंदुरबार तालुक्यातील भालेर येथील शिवदर्शन विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात वार्षिक पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला.
नं. वि. स. संचलित भालेर येथील शिवदर्शन विद्यालयात वर्षभरात झालेल्या विविध शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गुण गौरव करण्यात आला.
गुणानुक्रम आलेल्या विद्यार्थ्यांना कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दिनेश पाटील, भालेरच्या सरपंच वैशाली पाटील, नगावच्या सरपंच अनिता पाटील, तीसीचे सरपंच दिलीप पाटील, माजी विद्यार्थी वैभव पाटील यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्य स्वरुपात पारितोषिक देण्यात आले.
वैभव युवराज पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, भविष्यामध्ये यश संपादन करायचे असेल तर आपण नियमित अभ्यास करायला हवा व आपल्या करिअरच्या दृष्टीने या शाळेत होणाऱ्या विविध उपक्रम हे खूप महत्त्वपूर्ण ठरत असतात. त्यामुळे आपण अशा कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हायला हवे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे प्राचार्य तथा मुख्याध्यापक आर. एच. बागुल यांनी केले. आभार पर्यवेक्षक व्ही. जे. पाटील यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग नोंदवला.