नंदुरबार l प्रतिनिधी
आमदार राजेश पाडवींनी प्रयागराज येथे सुरू असल्यास कुंभमेळ्यात स्नान केले.यावेळी आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना केली.
शहादा तळोदा मतदारसंघाचे भाजपचे आमदार राजेश पाडवी यांनी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महा कुंभमेळ्यात सहकुटुंब श्रद्धेची डुबकी मारली असून आमदार राजेश पाडवी यांनी कुंभमेळ्यात शाही स्नान करत मतदार संघासाठी प्रार्थना केली आहे.
त्यासोबतच अयोध्या येथील प्रभू श्रीराम चंद्राच्या मंदिरात जाऊन मतदार संघात समस्या लवकरात लवकर सुटाव्यात आणि विकास कामांना गती मिळावी त्यासोबतच आदिवासी बांधवांच्या उद्धारासाठी त्यांनी श्रीराम चरणी प्रार्थना केली.
यावेळी अजय परदेशी, विशाल पाटील, गौरव वाणी, दिनेश खंडेलवाल, अतुल जयस्वाल ,जगदीश परदेशी, राजू गाडे, निलेश वळवी, संदीप मराठे देखील उपस्थित होते
“माझ्या आदिवासी बांधवांचे उद्धार व्हावा यासोबतच विधानसभेत असलेले प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावे विकास काम पूर्ण होऊन दोघी तालुक्यांना गती मिळावी यासाठी कुंभमेळ्यात पवित्र स्नान करत अयोध्येतील प्रभू श्रीराम चंद्राचं दर्शन घेत त्यांच्याकडे मतदारसंघासाठी प्रार्थना केली आहे-
राजेश पाडवी,
भाजप आमदार तळोदा शहादा मतदार संघ.