नंदुरबार l प्रतिनिधी
केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी किसान आयडी (शेतकरी ओळख क्रमांक) योजना सुरू केली आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना अनेक सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होणार आहे. शेतकऱ्यांनी जवळच्या सेतू केंद्रावर जाऊन आपला किसान आयडी काढून घ्यावा, असे आवाहन तहसीलदार मिलिंद कुलथे यांनी एका शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.
*किसान आयडीचे फायदे:*
• पीएम किसान योजनेचे हप्ते नियमित: किसान आयडीमुळे पीएम किसान योजनेचे हप्ते मिळण्यास कोणतीही अडचण येणार नाही.
• पीक पाहणी सोपी: किसान आयडीच्या मदतीने पीक पाहणी करणे सोपे होईल.
• नुकसान भरपाई: नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवणे सोपे होईल.
• सरकारी योजनांचा लाभ: किसान आयडीमुळे शेतकऱ्यांना सरकारी योजनांचा लाभ घेणे सोपे होईल.
• शेतकरी असल्याचा पुरावा: किसान आयडीमुळे शेतकरी असल्याचा पुरावा देणे सोपे होईल.
• मुलांच्या शिक्षणासाठी मदत: किसान आयडीचा उपयोग मुलांच्या शिक्षणासाठीही होईल.
*किसान आयडी कसा काढायचा?*
• किसान आयडी काढण्यासाठी शेतकऱ्यांनी आपले आधार कार्ड आणि मोबाईल नंबर जवळच्या सेतू केंद्रावर घेऊन जायचे आहे.
• शेतकरी ओळख क्रमांक मिळवण्यासाठी सेतू केंद्रावर जाऊन लवकर आपली किसान आयडी शेतकरी ओळख क्रमांक उघडून घ्यावा.
ही योजना शेतकऱ्यांसाठी खूप फायदेशीर असून, शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी आपल्या गावातील कृषी सहाय्यक किंवा तलाठी यांच्याशी संपर्क साधावा, असेही तहसिलदार श्री. कुलथे यांनी शासकीय प्रसिद्धी पत्रकान्वये कळविले आहे.