नंदुरबार l प्रतिनिधी-
तळोदा तालुक्यातील प्रतापुर शिवारातील शेतात बैल विकण्याच्या वादातून भावाने भावाचा लाकडी डेंगाऱ्याने मारहाण करून खून करून विल्हेवाट लावल्याची घटना घडली आहे.या प्रकरणी फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 24 सप्टेंबर रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास प्रतापपुर गावाच्या शिवारातील साहेबराव चव्हाण यांच्या शेतातील झोपडीत
संशयीत आरोपी सारपा कर्मा पाडवी रा.राणीपुर ता . तळोदा याने बैल विकत मागणीच्या कारणावरुन बामण्या कर्मा पाडवी ( वय 50 वर्षे ) रा.चिऊल उतार ता . अक्कलकुवा यास लाकडी डेंगाऱ्याने डोक्याला मारुन जिवे ठार करुन कोठेतरी प्रेताचे विल्हेवाट लावली आहे. तसेच सदर घटने बाबत साक्षीदार सौ . कौशल्याबाई सारपा पाडवी हीस जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी रायकाबाई बामण्या पाडवी रा.चिऊल उतार ता.अक्कलकुवा यांच्या फिर्यादीवरून तळोदा पोलीस ठाण्यात संशयीत आरोपी सारपा कर्मा पाडवी यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.त्याला पोलिसांनी अटक केली आहे.याप्रकरणी पुढील तपास सपोनि अमितकुमार प्रतापसिंग बागुल करीत आहेत.








