नंदुरबार l प्रतिनिधी-
आधुनिक काळात सर्व मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य मिळाले आहे ह्याचा 100 टक्के सदुपयोग करून घ्यावा.पूर्वीच्या काळी मुलींना शिक्षणाची संधी मिळायची नाही लवकर विवाह बंधनात अडकत होते. त्यामुळे त्यांच्या इच्छा अपूर्ण राहून जायच्या . त्यात तुमचा देखील समावेश असू शकतो पण आता तुम्ही तुमच्या मुलींना शिक्षणाचे स्वातंत्र्य प्राप्त झाले आहे त्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी द्या असे भालेर बीटच्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा पानपाटील या उपस्थित माता माता पालक मेळाव्यात उपस्थित महिलांना मार्गदर्शन करीत होत्या.
का. वि. प्र. संस्था संचलित द फ्युचर स्टेप स्कूल येथें हळदी कुंकू कार्यक्रम व आयोजित माता पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून भालेर बीट च्या शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रेखा पानपाटिल, संस्थेच्या संचालिका व भालेरच्या माजी सरपंच सौ बेबीबाई भास्करराव पाटील, सौ. शोभा सुनील पाटील , मुख्याध्यापिका सौ विद्या चव्हाण उपस्थित होत्या.
कार्यक्रमास उपस्थित माता पालक , सुहासिनी यांना हळदी कुंकू देवून भेट वस्तू देण्यात आली.
उपस्थित माता पालक यांच्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. त्यामुळे त्यांना रोजच्या दैनंदिन कामाच्या व्यापातून मनोरंजन झाले . विजयी महिलांना आकर्षक बक्षीस देण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती हर्षदा चव्हाण व सौ. शैला गिरासे यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.