म्हसावद । प्रतिनिधी:
विद्या गौरव प्रायमरी, गौरव सेकंडरी इंग्लिश मेडियम स्कुल,गौरव कला,विद्यान व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालय व त्रिमूर्ती महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गट शिक्षणाधिकारी शेखर धनगर हे होते. तर प्रमुख अतिथी म्हणून शिक्षण विस्तार अधिकारी वसंत जाधव पालक,शिक्षक संघा चे उपाध्यक्ष राजकुमार पाडवी,मोड गावाचे प्रगतिशील शेतकरी ब्रिजलाल चव्हाण, संस्थेचे मार्गदर्शक अशोक तांबोळी,संस्थेचे अध्यक्षा सौ.विद्यादेवीजी अशोक तांबोळी हे होते.तर हर्षवर्धन तांबोळी, सौ.अनन्या तांबोळी, शाळेचे मार्गदर्शक ललित पाठक,शाळेचे प्राचार्य विश्वास पवार,त्रिमूर्ती महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या सौ.वैशाली पाठक,माध्यमिक विद्यालय आमलाड चे मुख्याध्यापक तथा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष नरोत्तम मराठे, बोरद शाळेचे मुख्याध्यापक वसंत सोनवे,विद्या वाहिनी प्राथमिक विद्यामंदिर आमलाड चे मुख्याध्यापिका सौ. सुनिता चव्हाण,गंगामाई प्राथमिक विद्यामंदिर तळोदा चे मुख्याध्यापिका सौ. सारिका चौधरी यांची प्रमुख उपस्थिती होती.
त्यानंतर प्रास्तविकात मार्गदर्शक ललित पाठक यांनी वर्षभरात राबविलेल्या विविध स्पर्धा,भरवलेले विज्ञान प्रदर्शन,क्रीडा स्पर्धा,स्कॉलरशिप,नवोदय परीक्षा,शाळा अंतर्गत परीक्षा,आदर्श विद्यार्थी व खेळाडू,चित्रकला तसेच वर्षभरात वक्तृत्व स्पर्धा,असे अनेक विषयावर महिती दिली.यावेळी क्रीडा शिक्षक पुलायन जाधव यांना क्रीडा दिनानिमित्त उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांचा सत्कार संस्थे चे मार्गदर्शक अशोक तांबोळी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला.
त्यानंतर त्यानंतर कला महोत्सव घेण्यात आला.या महोत्सवात सर्व माध्यमा च्या विद्यार्थ्यांनी आपल्या कला गुणांचे प्रदर्शन दाखविले त्यात देशभक्ती पार गीत व नाटिका, आदिवासी नृत्य, लोकगीते,कोळी नृत्य,अंधश्रद्धा वर नाटिका व गीते,भारतीय लोककला,शास्त्रीय संगीत,पिरॅमिड, भारतीय सैनिक वर आधारित नाटिका व गीते आदी विविध विषयांवर आधारित कला गुणां वर आधारित मुलांनी आपले प्रदर्शन केले.सूत्रसंचालन शाळेचे शिक्षक निलेश ढोडरे , शिक्षिका समीक्षा मगरे, शिक्षिका रंजना शिंदे
इयत्ता १० ची विद्यार्थिनी श्रुती वळवी, इयत्ता ११ ची विद्यार्थिनी आचल शिरसाठ, लक्ष्मी माकट्या, यामिनी आशिराम यांनी केले. सर्व कार्यक्रम यशस्वी साठी शाळेचे सर्व शिक्षक, शिक्षाकेतर कर्मचारी यांनी घेतले. यावेळी सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.शेवटी आभार शिक्षिका रंजन शिंदे यांनी मानले.