Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे

team by team
January 27, 2025
in राज्य
0
शाश्वत शेतीच्या योजनांमधून जिल्ह्याची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल : पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे

नंदुरबार l प्रतिनिधी

विविध कृषि योजनांमधून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत असल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषि मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲङ माणिकराव कोकाटे यांनी केले आहे.

 

ते आज पोलीस कवायत मैदानावर 76 व्या भारतीय प्रजासत्ताक वर्धापन दिनाच्या मुख्य ध्वजारोहण समारंभात जिल्हावासीयांना संबोधित करताना बोलत होते. यावेळी खासदार ॲड गोवाल पाडवी, माजी खासदार डॉ. हिना गावित, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा कुमूदिनी गावित, डॉ. सुप्रिया गावित, भरत गावीत माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मित्ताली सेठी, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त एस., जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, अपर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, अपर जिल्हाधिकारी प्रकाश अहिरराव (ससप्र), सहाय्यक जिल्हाधिकारी अंजली शर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा पुरवठा अधिकारी गणेश मिसाळ, नगरपालिका प्रशासन अधिकारी नितीन कापडणीस, तहसिलदार डॉ. जी. व्ही. एस. पवनदत्ता, जिल्हा खनिकर्म अधिकारी दिपक चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक वर्षा लहाडे, विभागीय वन अधिकारी डॉ. प्रकाश गुजर, अधिक्षक राज्य उत्पादन शुल्क स्नेहा सराफ, प्रकल्प अधिकारी चंद्रकांत पवार व विविध यंत्रणांचे विभाग प्रमुख-कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते.

 

 

यावेळी बोलताना पालकमंत्री श्री. कोकाटे म्हणाले, जिल्ह्याला कार्यक्षम, पारदर्शक आणि लोकाभिमुख प्रशासनाचा आदर्श बनवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतील 100 दिवसांचा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधिक्षक आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाच्या सर्व स्तरांवर सुधारणा करण्यावर भर दिला आहे. कार्यालयीन संकेतस्थळे अद्ययावत करून, माहिती अधिकारासाठी डिजिटल साधने वापरण्यावर भर आहे. ‘आपले सरकार’ पोर्टलवरील तक्रारींचे निराकरण आणि सेवा हमी कायद्याची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्यात आली आहे, जेणेकरून नागरिकांना वेळेत सेवा मिळेल. स्वच्छता मोहीम अंतर्गत कार्यालयांमध्ये स्वच्छता, जुन्या वाहनांचे निर्लेखन व फाईल डिजिटायझेशन करण्यात येत आहे.

 

 

गुंतवणूकदारांना प्रोत्साहन, त्यांचे तक्रारींचे निराकरण, आणि उद्योगांना अनुकूल वातावरण निर्मितीला प्राधान्य आहे. अंगणवाड्या, शाळा, आणि आरोग्य केंद्रांना भेटी देऊन स्थानिक समस्या सोडवण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत. प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वाढवणे आणि नंदुरबार जिल्ह्याला आदर्श प्रशासकीय मॉडेल बनवणे हा आमचा उद्देश आहे. आपण, या 100 दिवसांच्या आराखड्याला यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे ते म्हणाले.

 

पुढे बोलतांना ते म्हणाले, जिल्ह्यात पाऊस सरासरीपेक्षा अधिक 938 मिलीमीटर (120 टक्के) पडला आहे. खरीपानंतर रब्बी हंगामातील पेरणी 100 टक्क्यांपेक्षा अधिक पूर्ण झाली आहे. शेतकऱ्यांसाठी पिक विमा, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी व गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना प्रभावीपणे राबवल्या जात आहेत. रोजगार व शेती सुधारण्यासाठी मनरेगा, राष्ट्रीय अन्न व पोषण सुरक्षा अभियान, उन्नत शेती-समृद्ध शेतकरी योजना तसेच सूक्ष्म सिंचन, वनराई बंधारे व शेततळ्यांच्या उपक्रमांतून शाश्वत शेतीसाठी योगदान दिले जात आहे. शासनाच्या या योजनांमुळे शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावत असून नंदुरबार जिल्हा आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करत आहे.

 

 

केंद्र शासनाच्या अॅग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत शेतकरी ओळख क्रमांक निर्मिती सुरू असून, नागरी सुविधा केंद्रांच्या मदतीने ही प्रक्रिया जिल्ह्यात वेगाने राबवली जात आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी आवश्यक असलेला हा ओळख क्रमांक जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी लवकरात लवकर मिळवावा. आदिवासी बांधवांच्या विकासासाठी विशेष केंद्रीय सहाय्य योजनेंतर्गत शेतीपूरक व्यवसायांना चालना दिली जात आहे. महिला बचत गटांना शेळ्या-बोकड पुरवठा व वनपट्टेधारक शेतकऱ्यांना जोडधंद्यासाठी शेळीपालनाचा लाभ दिला जात आहे. महिलांचे सक्षमीकरण, पॉवर विडर यंत्रे, बिगर यांत्रिकी बोटी, मत्स्यजाळे, व जंगली जनावरे पळवणारी यंत्रे या सुविधांद्वारे आदिवासी बांधवांचे जीवनमान उंचावण्याचा प्रयत्न सुरू आहे. या योजनांचा उद्देश आदिवासी समाजाला स्वावलंबी व आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवणे आहे.

 

 

पुढे बोलतांना ते म्हणाले, नवापूर तालुक्यातील श्री. योहान अरविंद गावीत यांनी प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत पिंजऱ्यातील मत्स्यव्यवसायात मोठे यश मिळवले आहे. त्यांच्या यशाची दखल घेऊन त्यांची प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील परेड व महामहिम राष्ट्रपतींच्या कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. हा जिल्ह्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. तसेच जिल्ह्यात या वर्षी आठवी आर्थिक गणना राबवून घरोघरी भेट देत व्यवसाय व उद्योगांची माहिती संकलित केली जाणार आहे. तसेच राष्ट्रीय नमुना पाहणीच्या 80 व्या फेरीत “कुटुंबाचा सामाजिक उपभोग: आरोग्य” या विषयावर सर्वेक्षण जानेवारी ते डिसेंबर 2025 दरम्यान होणार आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत लाभार्थ्यांचे 100 टक्के आधार सिडींग पूर्ण झाले असून, जिल्हा नाशिक विभागात प्रथम क्रमांकावर आहे. तसेच 95 टक्के रेशन कार्डांचे मोबाईल सिडींग पूर्ण झाले आहे.

 

 

ते पुढे बोलतांना म्हणाले, कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेत जिल्ह्याने 342 टक्के उद्दिष्टपूर्ती केली असून, पुरुष नसबंदीमध्ये महाराष्ट्रात पहिले स्थान मिळवले आहे. ग्रामीण रुग्णालयांमध्ये मोफत सोनोग्राफी, सिजेरियन सुविधा, तसेच नवापूर येथे ट्रामा केअर व डायलिसिस युनिट सुरू झाले आहेत. नंदुरबारच्या महिला रुग्णालयात राज्यातील पहिले मोफत आय.व्ही.एफ. क्लिनिक सुरू झाले असून, 76 जोडप्यांची तपासणी झाली आहे. या उपक्रमांमुळे “छोटे कुटुंब, सुखी कुटुंब” संकल्पना प्रभावीपणे राबवली जात आहे. तसेच सिकलसेल निर्मूलन मिशन अंतर्गत जिल्ह्यातील 0 ते 40 वयोगटातील 8 लाख नागरिकांची तपासणी मोहिम आजपासून सुरू होणार आहे. आतापर्यंत 3 लाख 90 हजार तपासण्या पूर्ण झाल्या असून 100 रुग्णांना अपंगत्व प्रमाणपत्र देण्यात आले आहे. लवकरच सर्व रुग्णांना अपंग प्रमाणपत्र व मोफत रक्तसुविधा कार्ड दिले जाईल. नागरिकांनी या तपासणी मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
 

*यांचा झाला सन्मान…*

*ध्वजनिधी संकलनात 100 टक्के इष्टांक वसूल केल्याबद्दल स्मृतिचिन्ह.*
• जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी.

*रक्तकेंद्र जिल्हा रुग्णालय, नंदुरबार येथे वर्ष 2024 या वर्षी 5 हजार पेक्षा जास्त रक्त पिशव्या संकलनाचा नवीन उच्चांक झाला. त्यानिमित्त प्रतिनिधीक स्वरूपात उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल अधिकारी-कर्मचारी यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला.*

 

• महेश कुंवर आयसीटीसी समुपदेशक,
• कपील पवार, प्रयोगशाळा तंत्रज्ञ,
• जयेश सोनवणे रक्तपेढील वैज्ञानिक अधिकारी,
• डॉ. रमा वाडीकर रक्तसंक्रमण अधिकारी.

*केंद्र शासनाच्या ॲग्री स्ट्रॅक या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांना शेतकरी ओळख क्रंमाक प्रमाणपत्र/सन्मान पत्र यावेळी मंत्री महोदयांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरूपात वितरीत करण्यात आले.*

• दिपक मोहन जोशी, खोंडामळी
• चंद्रशेखर रावसाहेब पाटील, खोंडामळी.
• विजयाबाई सुरेश पाटील, खोंडामळी.
• चितांमण स्त्रुजन भोई, कोपर्ली.
• प्रल्हाद भाईदास शिरसाठ, कोपर्ली.
• अशोक भिका पवार, कोपर्ली.
• कौस्तुभ कांतीलाल पटेल, बांभळोद.
• अनिल नाना पाटील, बाभंळोद.
• हसरत शांताराम जाधव, बाभंळोद.
• प्रमोद नतेश्वर पाटील, सातुर्खे.
• अंबिकाबाई नतेश्वर पाटील, सातुर्खे.
• दिलीप भिमसिंग गिरासे, अमळथे.
• देवचंद सुका कोळी, अमळथे.

*जिल्हा वार्षिक योजना वर्ष 2024-25 निधीतून खरेदी केलेल्या नवीन 13 वाहनांचे लोकार्पन पालकमंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते यावेळी करण्यात आले.*

यावेळी डॉ. काणे गर्ल्स हायस्कुल, एस. ए. मिशन हायस्कुल, अँग्लो उर्दू हायस्कूल व नवोद्यय विद्यालय, श्रावणी या विद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थींनी राष्ट्रभतीपर गीतावर योगासन, मल्लखांब व समूह नृत्यू सादर केले.

 

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी यांच्या हस्ते ध्वजारोहण

Next Post

भालेर येथील श्रीमती कपू पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप

Next Post
भालेर येथील श्रीमती कपू पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप

भालेर येथील श्रीमती कपू पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थ्यांचा निरोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

शहाद्याच्या सार्थक पाटीलला रोबोटिक्स ऑलिंपियाडमध्ये सुवर्णपदक

January 22, 2026
शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

शाश्वत शेतीसाठी जैविक कीड नियंत्रण काळाची गरज; नंदुरबार कृषी महाविद्यालयात प्रशिक्षण

January 22, 2026
अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

अविश्वास प्रस्तावावर निर्णय घेण्यासाठी, 27 जानेवारीला विशेष ग्रामसभेचे आयोजन

January 22, 2026
सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

सहकार आयुक्त दिपक तावरे यांनी केली, पतसंस्थांच्या संगणकीकरणाच्या कामाची पाहणी

January 22, 2026
नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

नंदुरबार जिल्हास्तरीय विज्ञान प्रदर्शनाचा दिमाखदार समारोप; विद्यार्थ्यांच्या वैज्ञानिक प्रतिभेचा गौरव

January 22, 2026
हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा :  कालीचरण महाराज

हिंदुत्वाचे सैनिक बनून संघटित व्हा आणि हिंदू मतांची वोट बँक स्थापन करा : कालीचरण महाराज

January 22, 2026

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री. शांताराम पी. पाटील
8275590450

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp-Add