नंदुरबार l प्रतिनिधी-
वैद्यकीय अधिकारी पदस्थापनेत आपल्या पदाच्या गैरवापर करून मोठ्या प्रमाणात आर्थिक व्यवहार करणाऱ्या गैरवापर करणारा जिल्हा डॉ वर्षा लहांडे यांना तात्काळ बंडतर्फ करावे अशी मागणी बिरसा आर्मी संघटनेतर्फे करण्यात आली आहे.
या निवेदनात म्हटले आहे की, वैद्यकीय अधिकारी ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालय येथे तात्पुरत्या स्वरूपात 11 महिन्याचा कालावधीसाठी जिल्हाधिकारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक या सर्व कमिटी सदस्यांच्या मंजुरीनंतर प्रस्ताव करून वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याच्या नियम असताना जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वर्षा लंहाडे यांनी आपला पदाचा गैरवापर करून जिल्ह्यात ग्रामीण रुग्णालय व उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांची कमिटीची कोणतीही सहमती व जिल्हाधिकाऱ्यांची मंजुरी न घेता 25 ते 30 वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती केली आहे व त्या संदर्भात एक महिन्याचा 80 हजार पगार प्रत्येकी एक वैद्यकीय अधिकाऱ्याकडून मागणी करून नियमबाह्य आदेश दिले आहेत .त्याचप्रमाणे कर्मचाऱ्यांना मानसिक त्रास देऊन आर्थिक लूट केली जात आहे.
या अगोदरही संबंधित डॉक्टरांवर स्त्रिभुन हत्या सारखे गुन्हे नोंद आहेत. म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक यांना सक्तीच्या रजेवर पाठवून एक उच्चस्तरीय समिती नेमून त्यांची चौकशी करावी व त्यांना सेवेतून बंडतर्फे करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन आज बिरसा आर्मी संघटनेतर्फे निवासी उपजिल्हाधिकारी हरीश भामरे यांना देण्यात आले आहे . जर त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर यापुढे तीव्र आंदोलन करण्यात येईल असे बिरसा आर्मी संघटनेतर्फे सांगण्यात आले. यावेळी बिरसा आर्मी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष निवास वळवी, नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी, धडगाव तालुका अध्यक्ष अजय वळवी ,भरत पावरा, अमित गावित अभिषेक गावित आदी उपस्थित होते.