Public Mirror News
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक
No Result
View All Result
Public Mirror News
No Result
View All Result

गावातील प्रत्येक मालमत्तेचा मिळेल डिजिटल नकाशा, मालक आणि शेतकऱ्याला मिळेल जमिन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

Mahesh Patil by Mahesh Patil
January 19, 2025
in राजकीय
0
गावातील प्रत्येक मालमत्तेचा मिळेल डिजिटल नकाशा, मालक आणि शेतकऱ्याला मिळेल जमिन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड : केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे

नंदुरबार l प्रतिनिधी-

स्वामित्व योजनेंतर्गत देशातील ग्रामीण भागातील जमिनींचे ड्रोनद्वारे मोजमाप केले जाईल आणि गावातील प्रत्येक मालमत्तेचा डिजिटल नकाशा तयार होण्याबरोबरच उपलब्ध कागदपत्रांच्या पुराव्यानुसार, संबंधित मालकाला, शेतकऱ्याला त्याच्या जमिन मालकीचे ई-प्रॉपर्टी कार्ड दिले जाईल, अशी माहिती केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी दिली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज देशभरात 50 लाख मालमत्ता पत्रकांचे आभासी वितरण करण्यात आले त्यात नंदुरबार जिल्ह्यातील 29 गावांना केंद्रीय युवा व्यवहार व क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्यक्ष वितरण करण्यात आले. त्यावेळी केंद्रीय मंत्री रक्षा खडसे बोलत होत्या.

यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावनकुमार, अप्पर जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, माजी जि.प. अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, माजी खासदार डॉ. हिना गावित, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) उदयकुमार कुसुरकर, नोडल अधिकारी जिल्हा अधीक्षक भुमि अभिलेख किरणकुमार पाटील, पदाधिकारी विजय चौधरी, निलेश माळी यांच्यासह 29 गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना केंद्रीय मंत्री श्रीमती खडसे म्हणाल्या, देशातील सर्वच भागात जमिनींच्या मालकी हक्काबद्दल नेहमीच विवाद उद्भवत असतात. तसेच, गरिबांच्या जमिनीवर जबरदस्तीने कब्जा केल्याची प्रकरणे देखील पहायला मिळतात. या सारख्या गोष्टींचा विचार करून देशाचे पंतप्रधान यांच्या संकल्पनेतून केंद्र सरकारने देशपातळीवर स्वामित्व योजना राबवली आहे.

देशातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अनेक लोकांकडे आजही आपले घर आणि जमिनीची कोणतीही कागदपत्रे उपलब्ध नाहीत. त्यामुळे सरकारकडून ग्रामीण भागातील शेती, जमीन आणि घरांचे सर्वेक्षण ड्रोनद्वारे केले जाते. सर्वेक्षण केल्यांनतर त्यांना त्यांच्या मालकीच्या संपत्तीचे ओळखपत्र देण्यात येईल. जेणेकरून कागदपत्रे नसलेल्या लोकांनाही निवासी जमिनीच्या संपत्तीचे अधिकार मिळतील, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

*या 29 गावांना मिळाले स्वामित्व प्रमाणपत्र*
• *अक्कलकुवा तालुका-* बि. अंकुशविहीर, घोटपाडा, शलटापनी, घुणशी, वीरपूर, व सिंगपुर बुद्रूक.
• *तळोदा तालुका-* मोहिदा, मोरवड, दलेलपूर, सिंगसपूर, व राणीपूर.
• *शहादा तालुका-* बिलाडी त.स., उंटावद, भडगांव, बुडीगव्हाण, व चिरडे.
• *नंदुरबार तालुका-* पळाशी, खोडसगांव, ओझर्दे, खैराळे, व वरुळ.
• *नवापूर तालुका-* कोठडा, वडखुट, अंठीपाडा, कडवान, तारापूर, बिलदा, नगारे व नावली.

*या 15 लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात देण्यात आले ‘ई-प्रॉपर्टी कार्ड*
सुक्रीबाई पुंजऱ्या कोकणी, हिरालाल मोतीराम कोकणी (ओझर्दे), सतीश नरसु पाटील, नलीबाई टिला पाटील (पळाशी), रमेश पोज्या गावित,दिवाजी राज्या गावित (खैराळे), राणीबाई सुरेश पाडवी, वीरसिंग पवार (वरुळ), यशवंत जगनलाल ठाकरे, पिंटू विश्राम ठाकरे (खोडसगांव), जेसमी रुना वळवी, मालती उखाड्या गावित, बैसी जेहऱ्या वळवी, विलास गावा वळवी व चिमा जिवल्या नाईक (नावली).

बातमी शेअर करा
Previous Post

जिल्हा परिषद निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांनी सज्ज व्हावे; शिवसेना संपर्कप्रमुख,माजी आ.चंद्रकांत रघुवंशी

Next Post

वैद्यकीय पदाचा गैरवापर करणारा जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.वर्षा लहांडे यांना बंडतर्फे करा, बिरसा आर्मी संघटनेची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

पथराई येथील सैनिकी विद्यालयात वाचन प्रेरणा दिवस साजरा

October 17, 2025
भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

भालेर येथील द फ्युचर स्टेप स्कूलमध्ये विद्यार्थ्यांनी साजरी केली दिवाळी व भाऊबीज

October 17, 2025
वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

वैजाली ते नांदर्डे पुलाजवळ होणार पर्यायी रस्ता, ग्रामस्थ आक्रमक, बांधकाम विभागाने दिले आश्वासन

October 17, 2025
गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

गाय वासरूच्या शिल्पाचे आ.चंद्रकांत रघुवंशी यांच्या हस्ते शुक्रवारी लोकार्पण

October 17, 2025
एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

एक हात मदतीचा” आवाहनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद

October 17, 2025
जिल्हा पोलीस सायबर सेलने 34 लाख तक्रारदारांना केले परत

जिल्हा पोलीस सायबर सेलने 34 लाख तक्रारदारांना केले परत

October 17, 2025

Total Views

  • 4,142,612 hits

मुख्य संपादक

श्री.महेश शांताराम पाटील
9404747458

At.post.Umarde Khurde ta.dist Nandurbar
मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458

  • Home
  • Sample Page

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

No Result
View All Result
  • Home
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • राजकीय
  • क्राईम
  • शैक्षणिक
  • कृषी
  • आरोग्य
  • सामाजिक

मुख्य संपादक महेश पाटील : +91 94047 47458.

कॉपी करू नका.
WhatsApp Group