नंदुरबार l प्रतिनिधी
ग्रामपंचायत,पंचायत समिती, जिल्हा परिषदेसह येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढण्यासाठी कार्यकर्त्यांनी तयारी करावी. कार्यकर्त्यांनी संघटितपणे फळी निर्माण करावी त्याशिवाय यश मिळणार हे लक्षात ठेवलं पाहिजे. आगामी निवडणुकीच्या संदर्भात पक्ष नेतृत्वाच्याच्या निर्णय मान्य करूनच काम करण्यात येईल असे प्रतिपादन शिवसेना शिंदे गटाचे संपर्कप्रमुख तथा माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी केले.
नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन रविवारी आ.राजेश पाडवी,आ. शिरीषकुमार नाईक व आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात आले. त्यानंतर संजय टाऊन हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमात माजी आ. चंद्रकांत रघुवंशी बोलत होते.ते पुढे म्हणाले, कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी केंद्र सरकारच्या योजनेतून 30 टक्के अनुदान आहे. त्यात 67 टक्के बाजार समितीच्या हिस्सा असून, शेतकऱ्यांच्या विकासासाठी जिल्हा नियोजन समितीतून बाजार समिती यांना निधी मिळावा यासाठी आ. राजेश पाडवी,आ.शिरीषकुमार नाईक आ. आमश्या पाडवी यांनी प्रयत्न करावेत.
यावेळी आ.आमश्या पाडवी यांनी माजी खा.हिना गावित यांच्यावर टीका केली.ते म्हणाले, हिना गावित यांच्या तिन्ही खासदारकीच्या निवडणुकीच्या वेळेस महायुतीच्या धर्म पाळत मी त्यांच्या प्रचार केला. परंतु,यंदाच्या निवडणुकीत त्यांनी महायुतीचा धर्म न पाळता माझ्या विरोधात निवडणूक लढवली आणि आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवडणूक लढवायला सांगितल्याचे ते बोलत आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी करीत आहेत. गावित फक्त कार्यकर्त्यांच्या निवडणुकीत वापर करून घेतात.
आ.राजेश पाडवी म्हणाले, मागे झालं गेलं ते विसरून जावं. येणारा काळ हा आपला असून, पक्ष मतभेद बाजूला ठेवून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जनतेसाठी लढू. आ. शिरीषकुमार नाईक म्हणाले, जिल्हा परिषदेत आमदार निधीसाठी पत्र द्यायचे त्यावेळेस टक्केवारी घेऊन भ्रष्टाचार केला जात होता. उद्या परवा प्रशासक बसताच कर्मचाऱ्यांनी दिवाळी साजरी केली. जिल्हा परिषदेच्या कारभाराला सर्वच कंटाळलेले होते.
यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख ॲड. राम रघुवंशी, नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती संध्या पाटील, उपसभापती गोपीचंद पवार,शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अभिजीत पाटील,जि.प माजी अध्यक्ष वकील पाटील,जि.प माजी सदस्य विजयसिंह पराडके, पं.स माजी सभापती अंजना वसावे, सामाजिक कार्यकर्ते इंजि.किरण तडवी, माजी सभापती विक्रमसिंह वळवी, शेतकी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील,,जि.प माजी सदस्य देवमन पवार, शिवसेना तालुकाप्रमुख डॉ. सयाजीराव मोरे,पं.स माजी उपसभापती छाया पवार, भाजीपाला असोसिएशनचे अध्यक्ष विजय माळी उपस्थित होते.
*या कामांचे झाले भूमिपूजन*
कृषी उत्पन्न बाजार समितीच्या म.ज्योतिबा फुले भाजीपाला मार्केट यार्डातील लिलाव शेडचे भूमिपूजन आ. राजेश पाडवी, मुख्य बाजार आवारात डांबरीकरण व ओटे बांधकामाचे भूमिपूजन आ. शिरीषकुमार नाईक, कल्याणी पेट्रोल पंप जवळील शॉपिंग सेंटरसह गोडाऊनचे भूमिपूजन आ. आमश्या पाडवी यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.