नंदुरबार l प्रतिनिधी-
भटक्या व विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गातील लाभार्थ्यांना ग्रामीण भागात यशवंतराव चव्हाण घरकुल व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वैयक्तिक घरकुल योजना राबविण्यात येत आहे. या योजनेचा लाभ देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाजकल्याण सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी दिली.
*शिबिरारांचे वेळापत्रक:*
• पंचायत समिती नंदुरबार: गुरुवार, 16 जानेवारी 2025
• पंचायत समिती शहादा: शुक्रवार, 17 जानेवारी 2025
• पंचायत समिती अक्कलकुवा: सोमवार, 20 जानेवारी 2025
• पंचायत समिती नवापूर: मंगळवार, 21 जानेवारी 2025
• पंचायत समिती तळोदा: बुधवार, 22 जानेवारी 2025
• पंचायत समिती धडगाव: गुरुवार, 23 जानेवारी 2025
🕙 *सर्व ठिकाणची शिबिरे सकाळी 10 वाजता ते सायंकाळी 5 या वेळेत होतील.*
🏡 *योजनेंतर्गत लाभ:*
ग्रामीण भागात घर बांधण्यासाठी टप्प्याटप्प्याने ₹1,20,000 अनुदान देण्यात येईल.
📋 *यशवंतराव चव्हाण वैयक्तिक घरकुल व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर भटक्या जमाती-क प्रवर्गातील धनगर समाजाच्या बांधवांसाठी वैयक्तिक घरकुल योजनेसाठी लाभार्थी पात्रता:*
• सक्षम अधिकाऱ्याने दिलेला जातीचा दाखला
• ग्रामपंचायतीचा ठराव
• लाभार्थी कुटूंब गावोगावी भटकंती करणारे असावे.
• झोपडी/कच्चे घर अथवा पालामध्ये राहणारे असावे.
• कच्चा घराचा फोटो.
• लाभार्थी भुमीहिन किंवा अल्पभुधारक असावा.
• महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असावा.
• वार्षिक उत्पन्न 1 लाखाच्या आत असावे.
• लाभार्थी वर्षभरात 6 महिने एका ठिकाण वास्तव्यास असावा.
• दारिद्र्य रेषेखालील कुटूंब असावे.
• विधवा, परितक्त्या किंवा अपंग महिला यांना प्रथम प्राधान्य.
• सातबारा उतारा किंवा घराचा 8 नं. उतारा.
• घरपट्टी/पाणीपट्टी/विद्युत बिल पुरावा.
• लाभार्थ्यांचे बँकेचे पासबुक.
• सदर योजनेचा लाभ पात्र कुंटूंबातील एकाच व्यक्तीस देण्यास येत असल्याबाबत दाखला.
महत्त्वाचे
भटक्या व विमुक्त जाती तसेच भटक्या जमाती-क प्रवर्गातील पात्र लाभार्थ्यांनी योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसह शिबिराला उपस्थित राहून वैयक्तिक घरकुल योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहाय्यक आयुक्त सुंदरसिंग वसावे यांनी केले आहे.