नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील एस. ए. मिशन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रांगणात दोन दिवसीय कार्निवल महोत्सवाचे उद्घाटन करण्यात आले. महोत्सवात दोन हजार पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी पहिल्या दिवशी सहभाग नोंदवला.
उद्घाटनप्रसंगी स्विडन देशातून आलेले रेव्हरंड रोलैंड ओस्कार सन, रेव्हरंड हेलियाना ओस्कारसन, रेव्हरंड उल्फ हॅगवीट, रेव्हरंड मर्टिन स्टॉर्म, संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. राजेश वळवी, प्राचार्य नूतनवर्षा वळवी, डॉ. सुनीता अहिरे, सुषमा कालू, संदेश यंगड, समंद नाथानी, रेव्हरंड अनुप वळवी, विजय पवार, संगीता रघुवंशी, राज जयकर, वदंना जांबीलसा आदी उपस्थित होते.
महोत्सवात एसए ट्रस्टच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते. यावेळी मुलांसाठी आकाश पाळणे, व्हिडीओ गेम गेम झोन निर्माण करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते फीत कापून कार्निवल चे उदघाटन करण्यात आले. प्रास्ताविक सुनीता कुवर आणि फराहना शेख यांनी केले. कार्यक्रमात रेव्हरंड रोलँड यांनी मराठीतून मनोगत व्यक्त करताना, लहानपनापासूनच भारत भेटीसाठी येत आहे तेव्हापासून ते आतापर्यंत भारताची जोरदार प्रगती पाहायला मिळत आहे ही प्रगती बघून खूप आनंद होत असल्याचे सांगितले.
सांस्कृतिक कार्यक्रमांत प्राथमिक वर्गाच्या चिमुल्यांनी माता पालकांसोबत रॅम्प वॉक करत धम्माल उडवून दिली. पर्यावरणाचा संदेश देणारा फॅशन शो व मोबाईलच्या दुष्परिणामावर आधारीत नृत्य विद्यार्थ्यांनी सादर केले. महोत्सवात आर्ट अँड क्राफ्ट झोन, परसबाग झोन, मॅथ झोन आणि सायन्स झोन तयार करण्यात आला होता.
या कार्यक्रमातील विविध झोन्स
आर्ट अँड क्राफ्ट झोन मध्ये विविध सणांचे माहितीचे पत्रक, गडकिल्यांची प्रतिकृती, बैलगाडिची प्रतिकृती , फुलदाण्या, पेंटिंग,वॉल हॅकिंग, क्राउन्स लावण्यात आले होते.
परसबाग झोन मध्ये सेंद्रिय परसबागचे मॉडेल, हायड्रोपोनिक मॉडेल तसेच त्यात पिकवले जाणाऱ्या मुळा, वांगी,कोथंबीर,टमाटे भाजीपाला आदी प्रदर्शीत करण्यात आले.
मॅथ झोन मध्ये पायथागोरस मॉडेल, आयलर्स मॉडेल त्रिकोणमितीय आकार आदी.
सायन्स झोन मधे मानवी सांगाडा, पचन संस्था, श्वसन संस्था, कानाचे अंतररंग आदी प्रदर्शन केले होते.रोबोटिक्स झोनमधे भुकपंविरोधी सूचना देणारे यंत्र,स्ट्रीट लाईट प्रोजेक्ट, आंधळ्या माणसाची काठी, टोलगेट सिस्टीम, पाण्याच्या पातळीचे सूचनादर्शक आदी.बुक झोन्समधे मनोरंजनात्मक, जनरल नॉलेज, ऐतिहासिक असे विविध पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले होते.स्पार्क फाउंडेशन अमळनेर यांचे शिवकालीन दुर्मिळ शस्त्रांचे प्रदर्शन भरविण्यात आले यात दांडपट्टा, धातूच्या खेळण्या,तलवारी अडकित्ते,सुऱ्या,कट्यार, मराठा धोप इ. हत्यार प्रदर्षित करण्यात आले होते. बारा बलुतेदार झोनमधे समाजातील बारा बरलूतेदार पद्धतीचा दर्शन घडविणारे कुंभार, सुतार, लोहार यांचे मातीपासून बनविलेल्या भांडी, कोरीवकाम तसेच लाकडी वस्तू तसेच वापरात येणाऱ्या वस्तूंचे प्रदर्शन दाखविण्यात आले.संगीत झोन मध्ये तबला, घुंगरू, खंजीरी, ढोल, हार्मोनियम,सिंथे सायजर, व्हायलीन तसेच गेल्या दोन शतकातील संगीत क्षेत्रातील ऋषींतुल्य व्यक्तिमत्व असलेल्या भरीव योगदान देणाऱ्या महारथींचे दुर्मिळ छायाचित्र प्रदर्शन भरविण्यात आले आहे.गेमझोन मधे लहान मुलांनी भरभरून आनंद लुटला यामधे व्हरच्युअल रिऍलिटी, किंग ऑफ हॅमर, व्हिडीओ गेम्स, फिशिंग गेम्स, डार्ट गेम्सचे आयोजन करण्यात आले होते. फूड झोन मध्ये पाणीपुरी, भेलपुरी, कचोरी, पास्ता,लिंबू शिकंजी,पावभाजी, चायकॅफे, आईस्क्रीम, लस्सी इत्यादी खाद्यपदार्थांचे स्टॉल लावण्यात आले.शाळेतील स्काऊट गाईड विभागातर्फे खरी कमाई व सेवा महोत्सव अंतर्गत पाणी बॉटल विक्रीचा स्टॉल लावण्यात आला.