नंदुरबार l प्रतिनिधी
नंदुरबार शहरातील गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्या मंदिर व आदर्श गुजराती विद्या मंदिर येथे शालेय विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. प्रदर्शनात तिसरी व चौथीच्या वर्गातून विविध विषयांवर एकूण 80 उपकरणे मांडण्यात आली. यात 120 विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. यात प्रथम क्रमांक ऋषिकेश महेश पाटील यांनी तयार केलेल्या भूकंप सुचक यंत्राला मिळाला आहे.
प्रदर्शनाचे उद्घाटन बीएड कॉलेजच्या प्राचार्या सौ.नंदा वसावे व संस्थेचे सदस्य मनीष शहा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी परीक्षक प्रा.डॉ.दिनेश देवरे, प्रा. आर.एस.माळी, मुख्याध्यापक सौ. मीनाक्षी भदाणे,मुख्याध्यापक भद्रेशकुमार त्रिवेदी, प्रा.युवराज पाटील,पर्यवेक्षिका सौ. सीमा पाटील, शालेय विज्ञान प्रमुख फकीरा माळी उपस्थित होते. प्राचार्या सौ.वसावे यांनी खूप पुस्तकांचे वाचन करा तसेच डॉ. कलाम यांनी जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करा असे प्रतिपादन केले. प्रदर्शनात प्रथम क्रमांक -ऋषिकेश पाटील(भूकंप सूचक यंत्र),द्वितीय क्रमांक- कल्याणी निलेश सूर्यवंशी(आपत्ती व्यवस्थापन), तृतीय क्रमांक- मैत्रेय सूर्यवंशी(प्रकाशाचे गुणधर्म), उतेजनार्थ- विक्रांत पाटील(वेस्ट वॉटर ट्रीटमेंट)या विद्यार्थ्यांनी पारितोषिक पटकावले. उपकरण सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांनी उपकरणाची विस्तृत माहिती परीक्षकांसमोर सादर केली. प्रास्ताविक मुख्या.सौ मीनाक्षी भदाणे यांनी केले .सूत्रसंचालन फकीरा माळी यांनी केले. आभार तुषार सोनवणे यांनी मानले. प्रदर्शन यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
*ऋषिकेश पाटील प्रथम*
गोकुळदास देसाई आदर्श मराठी विद्या मंदिर व आदर्श गुजराती विद्या मंदिर येथे शालेय विज्ञान प्रदर्शनात ऋषिकेश महेश पाटील याने तयार केलेल्या भूकंप सूचक यंत्राला प्रथम क्रमांक देण्यात आला. रात्रीच्या वेळी झोपेत आपल्याला भूकंपाची जाणीव होत नाही. अशावेळी या यंत्राद्वारे आवाज निर्माण होऊन आपल्याला भूकंपाची सूचना मिळते
यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी जीवित हानी टाळता येते .
श्री.तुषार सोनवणे, वर्गशिक्षक