नंदुरबार l प्रतिनिधी
का.वि. प्र.संस्था भालेर संचलित श्रीमती क.पु.पाटील माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात व द फ्युचर स्टेप इंग्लिश मीडियम स्कूल भालेर ता. जि. नंदुरबार येथे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष भास्करराव पाटील यांनी प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला निंभेल येथील पालक आनंदा गैधल पाटील,योगेश आनंदा पाटील विद्यालयाच्या प्राचार्य सौ.विद्या चव्हाण, पर्यवेक्षक एम बी अहिरे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेची पूजन करण्यात आले. सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.
त्यात विद्यार्थिनींनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची ओळख आपल्या भाषणातून करून दिली . सौ सी व्ही पाटील यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
द. फ्युचर स्टेप स्कूल.
येथील द फ्युचर स्टेप स्कूल भालेर येथे क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती व बालिका दिवस निमित्त प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले . यावेळी क पू पाटील विद्यालयाचे पर्यवेक्षक एम. बी. अहिरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापक एम. आर. पाटील व पी. एस. सूर्यवंशी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निखिल पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन उमेश सोनवणे यांनी केले. कार्यक्रम यशविस्तेसाठी शाळेच्या सर्व शिक्षक शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. तसेच सावित्रीबाई फुले यांचा जीवन परिचय विद्यार्थ्यांना करून दिला. कार्यक्रमास सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी वृंद उपस्थित होते.