नंदुरबार l प्रतिनिधी
मिशन कवच कुंडल अभियाना अंतर्गत तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र कोपर्ली अंतर्गत उपकेंद्र भालेर मधील भालेर,नगाव, तिसी, वटबारे गावात कोविड लसीकरण उपस्थित लाभार्थ्यांसाठी कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी 314 जणांचे लसीकरण करण्यात आले.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.जे.आर.तडवी, वैद्यकीय अधिकारी कोपर्ली डॉ. दिलीप पाडवी, वैद्यकीय अधिकारी भालेर डॉ.सतीश नांद्रे, दिगंबर गंधाले, सुशांत उनावणे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. या लसीकरण शिबिरात भालेर येथे 199 तर वटबारे येथे 115 असे एकूण 314 जणांचे लसीकरण करण्यात आले. मिशन कवच कुंडल अभियाना अंतर्गत कोविड लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी मिशन कवच कुंडल टीम मधील आलेले सर्व आरोग्य सेविका,प्राथमिक आरोग्य केंद्र कोपर्ली अंतर्गत असलेले सर्व आरोग्य सहायक, समुदाय आरोग्य अधिकारी भालेर, सरपंच , उपसरपंच गजानन पाटील, डॉ.राकेश पाटील, ग्रामपंचायत सदस्य, .आरोग्य सेवक, आरोग्य सेविका , ग्रामसेवक, तलाठी , अंगणवाडी सेविका, आशा, अंगणवाडी मदतनीस ग्रामपंचायत सर्व कर्मचारी व सर्व स्वयंसेवक यांनी परिश्रम घेतले. या शिबिरासाठी एन.एस. ई. फाऊंडेशनने जनजागृतीसाठी सहकार्य केले. लाभले.








