नंदुरबार l प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया युवक आघाडी नंदुरबार तर्फे नंदुरबार ता. भालेर येथील जलतरणपटू आदित्य मिलिंद पिंपळे (इयत्ता 8 वी) याचा गुणगौरव करण्यात आला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय सागरी जलतरण स्पर्धेत 3 किमी अंतर यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल त्याला शॉल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
त्याप्रसंगी नंदुरबार आर पी आय आठवले जिल्हा सरचिटणीस राम साळुंके युवक जिल्हाध्यक्ष सुभाष पानपाटील, इंजी, धर्मेंद्र त्रिपाठी,एडवोकेट प्रेमानंद इंद्रजीत, शहराध्यक्ष मोहन पवार,युवक शहराध्यक्ष सचिन पिंपळे, महेंद्र बाविस्कर सुभाष पेंढारकर,मिलिंद पिंपळे, टिना पिंपळे आदि मान्यवर उपस्थित होते.